दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार

दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 19, 2024 02:52 PM IST

'नमस्ते घोस्ट' हा दाक्षिणात्य हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहाता येणार आहे. जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार...

Namaste Ghost: नमस्ते घोस्ट ओटीटीवर
Namaste Ghost: नमस्ते घोस्ट ओटीटीवर

सध्या हॉरर कॉमेडी चित्रपटांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा देखील या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना हे चित्रपट घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्याची इच्छा असते. या यादीमध्ये 'नमस्ते घोस्ट' या चित्रपटाचा देखील समावेश आहे. जर तुम्हाला हा दाक्षिणात्य हॉरर कॉमेडी चित्रपट 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा असेल तर जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार...

काय आहे चित्रपटाची कथा?

'नमस्ते घोस्ट' या चित्रपटात शिवाची कथा दाखवण्यात आली आहे. दररोज तेच सतावणारे स्वप्न पाहिल्यानंतर, शिवाचा रूममेट त्याच्याकडे असलेल्या औइजा बोर्डचा वापर करून, आत्मांना आमंत्रित करण्यास मदत करणारा खेळ खेळण्यास सुचवतो. जरी शिवा आत्मा या गोष्टीवर विश्वास ठेवत नसला तरी, तो हा खेळ खेळण्यास होकार देतो. खेळ खेळताना त्याच्या समोर समस्या निर्माण होतात, शिवाला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? त्यांनी कोणाच्या आत्म्याला आमंत्रित केले? शिवाच्या जीवनाचे रहस्य काय आहे? त्याला रोज सतावणाऱ्या स्वप्नाचा अर्थ काय? त्या अडचणींवर तो कशी मात करतो? हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
वाचा : 'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा

कोणते कलाकार आहेत?

'नमस्ते घोस्ट' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक भरत नंदा यांनी केले आहे. तसेच त्यांनी चित्रपटात काम देखील केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या राज महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्यासोबतच शिवमोग्गा हरीश, बाला रावडी, शिवकुमार आराध्या चेतन नांजेगौडे आणि इतर अनेक नावाजलेले कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात, जुई गडकरीने पोस्ट करत केले आवाहन

कधी आणि कुठे पाहायला मिळणार चित्रपट?

'नमस्ते घोस्ट' हा चित्रपट २१ जून २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कन्नड चित्रपटसृष्टीमधील अतिशय गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा : कसला बॉम्ब पडलाय यार; आई-बाबा होणाऱ्या निपूण-वैदेहीची गोष्ट! 'एक दोन तीन चार'चा टीझर प्रदर्शित

Whats_app_banner