Baaplyok: नागराज मंजुळेचा 'बापल्योक' सिनेमा पाहिला का? आता होणार ओटीटीवर प्रदर्शित-nagraj manjule movie baaplyok now on amazon prime ott platfrom ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Baaplyok: नागराज मंजुळेचा 'बापल्योक' सिनेमा पाहिला का? आता होणार ओटीटीवर प्रदर्शित

Baaplyok: नागराज मंजुळेचा 'बापल्योक' सिनेमा पाहिला का? आता होणार ओटीटीवर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 25, 2024 01:08 PM IST

Nagraj Manjule Movie: ‘बापल्योक’ हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Baaplyok
Baaplyok

आजकाल अनेक चित्रपट हे सिनेमागृहामध्ये कधी येऊन जातात हे कळत ही नाहीत. पण ओटीटीवर प्रदर्शित होताच त्याची आणखी चर्चा रंगते. ओटीटी विश्व हे प्रेक्षकांसाठी अक्षरश: मनोरंजनाची मेजवानी ठरते. आता प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'बापल्योक' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. चला जाणून घेऊया हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे.

आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचे ओझे घेऊन धावणाऱ्या बापाने अजून जोरात पळायला हवे, असे प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असत. पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो, तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात. प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही. आणि दुसऱ्याची बाजूही कळत नाही. हाच प्रवास नागराज मंजुळे यांच्या ‘बापल्योक’ या चित्रपटात पाहायला मिळत आहे.
वाचा: लग्न करुन घरी परतत असताना बायको हरवली, आमिर खानच्या 'लापता लेडीज'चा ट्रेलर पाहिलात का?

वडिल मुलाच्या नात्याचे मर्म सांगणारा आणि ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेला 'बापल्योक’ हा चित्रपट अॅमेझॅान प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. मोठया पडदयावर चित्रपटाला जो चांगला प्रतिसाद मिळाला तोच प्रतिसाद अॅमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही मिळेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

‘बापल्योक’ हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहांत दाखल झाला होता. ‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे.अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे.

Whats_app_banner
विभाग