
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुनची दुसरी पत्नी आमला बद्दल तुम्ही ऐकले आहे का? आमला एक समाज सेविका, डान्सर आणि अभिनेत्री आहे. नागार्जुनने पहिली पत्नी लक्ष्मीला १९९० साली घटस्फोट दिला. त्यानंतर आमलाशी १९९२ साली लग्न केले. आज १२ सप्टेंबर रोजी आमलाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
आमला अक्कीनेनीचा जन्म हा कोलकातामध्ये १२ सप्टेंबर रोजी १९६८ साली झाली. तिचे वडील नेवी ऑफिसर होते. आमलाने बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन भरत नाट्यमचे शिक्षण घेतले. १९८६ साली आमलाने अभिनयच्या प्रवासाला सुरुवात केली. तिने तमिळ चित्रपट इथिली इनाई कठालीमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पहिल्यावहिल्या चित्रपटानेच आमलाला ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
वाचा: तृतीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंतने सांगितलं वास्तव
१९८७ साली आमलाने पुष्पका विमाना या तेलुगू चित्रपटात काम केले. त्यानंतर ती याच चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये दिसली. १९८८ साली आमलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने दयावान या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. १९९१ साली तिने मल्याळम सिनेमा 'इथे सूर्या पूथ्रिक्कू'मध्ये काम केले. त्यानंतर २०१० साली ती छोट्या पडद्यावरील सुपर मॉम या कार्यक्रमात दिसली. आज आमलाकडे घर, बंगला, गाड्या आहेत. तिच्याकडे ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
करिअरच्या सुरुवातीलाच आमलाने नागार्जुन सोबत काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे चित्रपट हिट देखील ठरले. सतत एकत्र असल्यामुळे नागार्जुन आणि अमलाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नसल्यामुळे नागार्जुनने लग्न केले नव्हते. अखेर १९९० साली त्याने लक्ष्मीला घटस्फोट दिला. त्यानंतर लगेच १९९२ साली त्याने अमलाशी दुसरा विवाह केला. नागार्जुनला दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव नागाचैतन्य आहे. तर धाकट्या मुलाचे नाव अखिल अक्कीनेनी आहे. नागार्जुनची दोन्हीही मुले नेहमी एकत्र येताना दिसतात.
संबंधित बातम्या
