सध्या अनेक बॉलिवूड कलाकार हे मालदीवला जाण्यास विरोध करताना दिसत आहेत. या मागचे कारण म्हणजे मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे सुरु झाल्या. या एका घटनेमुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्याही आता मालदीवच्या विरोधात उतरल्या आहेत. तसेच बॉलिवूड कलाकारही मालदीवला जाण्यास नकार देताना दिसत आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुनने देखील मालदीवला जाण्यास नकार दिला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनने मालदीव ट्रिप रद्द केली आहे. तसेच लक्षद्वीपला पाठिंबा दिला आहे. नागार्जुनने सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण मोदींच्या दौऱ्यानंतर त्याने त्याचा निर्णय बदलला. संगीतकार एमएम किरावनीसोबत बोलताना नागार्जुनने लक्षद्वीपबद्दल भाष्य केले आहे. नागार्जुन म्हणाला,"१७ जानेवारी २०२४ रोजी सुट्टीसाठी मी मालदीवला जाणार होतो. कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी मी मालदीवला जाणार होतो. 'बिग बॉस' आणि 'ना सामी रंग'नंतर आता मी मालदीवला सुट्टीसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. मालदीवचा वाद सुरू नसताना मी अनेकदा तिथे गेलो आहे. पण आता नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपची वेगळी ओळख करुन दिली आहे."
वाचा: आमिर खानचा लेक जुनैद सध्या काय करतो?
नागार्जुनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'ना सामी रंग' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. यापूर्वी नागार्जुनचा 'द घोस्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्याच्या 'ना सामी रंग' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.
नागार्जुनसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी मालदीव, लक्षद्वीप प्रकरणावर भाष्य केले होते. यापूर्वी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, पूनम पांडे यांनी मादीवल वादावर प्रतिक्रिया दिली. सर्वांनी भारतातील पर्यटनाला पाठिंबा दिला. तसेच मालदीवच्या मंत्र्यांवर टीका केली.