मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nagarjuna: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Nagarjuna: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 27, 2024 08:55 AM IST

Nagarjuna: नागार्जुनने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर बॉडीगार्डच्या त्या कृतीची माहिती देखील मागितली. त्यानंतर त्याने जे काही कृत्य केले ते पाहून सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला.

nagarjuna
nagarjuna

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. नागार्जुन हा नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. सध्या सोशल मीडियावर नागार्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या बॉडीगार्डने जे काही कृत्य केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी नागार्जुनला सुनावल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने माफी मागितली. तसेच त्यानंतर केलेल्या कृत्याचे सर्वांनी कौतुक केले.

काय आहे व्हिडीओ?

नागार्जुन हा मुंबई विमानतळावर दिला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या बॉडीगार्ड देखील होता. एक अपंग चाहत्या नागार्जुनला भेटण्यासाठी पुढे आला होता. पण बॉडीगार्डने त्याला उचलून बाजूला ठेवले. खूप किंचाळल्यानंतर नागार्जुनचे लक्ष त्याच्याकडे गेले. तेव्हा तो जाऊन त्याला भेटला आणि मिठी मारली.आपली कोणतीही चूक नसल्याचेही त्यांनी सांगितले. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी नागार्जुनला सुनावले होते.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

ट्रेंडिंग न्यूज

नागार्जुनच्या नव्या व्हिडीओने वेधले लक्ष

दरम्यान, नागार्जुनचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नागार्जुन मुंबई विमानतळावर आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसत आहे. तो एका चाहत्यासोबत फोटो काढत असताना फोटोग्राफर्सनी त्यालाच धक्काबुक्की केल्याचे सांगितले. नागार्जुन म्हणतो की यात त्याची चूक नाही. यावेळी तिथे उपस्थित असलेले इतर फोटोग्राफरही म्हणतात की हो, यात त्यांचा दोष नव्हता, असे अनेकदा घडते. त्यानंतर नागार्जुनने दिव्यांग चाहत्याला मिठी मारली आणि म्हणाली की यात तुझी चूक नाही. नागार्जुनचा हा मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: गौरव मोरेच्या 'अल्ल्याड पल्ल्याड'ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ

काय घडलं होतं नेमकं?

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नागार्जुनचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नागार्जुन त्याच्या बॉडीगार्डसोबत विमानतळावर दिसत आहे. त्यावेळी विमानतळावर उपस्थित असलेले अनेक चाहते फोटो काढण्यासाठी आले होते. मग अपंग चाहता नागार्जुनच्या दिशेने येतो आणि नागार्जुनचा बॉडीगार्ड त्याला बाजूला करतो. नागार्जुन देखील बॉडीगार्डला थांबवत नाही. ते पाहून चाहते संतापले. हा व्हिडीओ शेअर करत त्याने 'माणुसकी कुठे आहे?' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का

WhatsApp channel