Nagarjuna Birthday Special: नागार्जुनमुळे आजही अविवाहित आहे ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nagarjuna Birthday Special: नागार्जुनमुळे आजही अविवाहित आहे ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

Nagarjuna Birthday Special: नागार्जुनमुळे आजही अविवाहित आहे ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Aug 29, 2022 08:34 AM IST

Nagarjuna Akkineni: नागार्जुनने १९९० साली प्रदर्शित झालेल्या 'शिवा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नागार्जुन आणि ही अभिनेत्री जवळपास १० वर्षे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

<p>नागार्जुन अक्कीनेनी</p>
<p>नागार्जुन अक्कीनेनी</p> (HT)

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि चित्रपट निर्माता नागार्जुन हा सतत चर्चेत असतो. आज २९ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्याने १९६७ साली बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने १९८६ साली 'विक्रम' या चित्रपटात काम करत अनेकांची मने जिंकली. हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. त्यानंतर नागार्जुनला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. पण तुम्हाला माहितीये का नागार्जुनमुळे एक बॉलिवूड अभिनेत्री आजही अविवाहित असल्याचे म्हटले जाते.

नागार्जुनने १९९० साली प्रदर्शित झालेल्या 'शिवा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो ‘खुदा गवाह’, ‘द्रोही’, ‘अंगारे’, ‘जख्म’, ‘अग्नि वर्षा’ अणि ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमध्ये काम करताना दिसला. दरम्यान, एका चित्रपटाच्या सेटवर तो बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तब्बू आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नागार्जुन आणि तब्बूची ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशन जवळजवळ १० वर्षे सुरु असल्याचे म्हटले जाते. त्यावेळी नागार्जुन विवाहित असताना देखील त्याला तब्बूसोबतचे नाते कायम ठेवायचे होते. पण तब्बूला हे मान्य नव्हते. अखेर तब्बूने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. नागार्जुनसोबतच्या या ब्रेकअपनंतर तब्बूने अद्याप लग्न केलेले नाही. नागार्जुनने तब्बूला स्वत:च्या घराजवळ दुसरे घर घेऊन दिले होते अशीही चर्चा त्यावेळी होती.

१९८४ साली नागार्जुनने चित्रपट निर्माते डी. रामानायडू यांच्या मुलीशी लग्न केले होते. रामानायडू आणि नागार्जुनचे वडील जवळचे मित्र होते. रामानायडू यांच्या मुलीचे नाव लक्ष्मी डग्गुबती असे होते. मात्र नागार्जुन आणि लक्ष्मीचा संसार फार काळ टिकला नाही. १९९०साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागार्जुनने अभिनेत्री अमलाशी लग्न केले.

Whats_app_banner