Naga Chaitanya-Sobhita : नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे विधी सुरू, हळदी सोहळ्यात रंगली वधूची चर्चा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naga Chaitanya-Sobhita : नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे विधी सुरू, हळदी सोहळ्यात रंगली वधूची चर्चा!

Naga Chaitanya-Sobhita : नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे विधी सुरू, हळदी सोहळ्यात रंगली वधूची चर्चा!

Published Nov 29, 2024 04:43 PM IST

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाआधीचे विधी सुरू झाले आहेत.

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Haldi
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Haldi

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Haldi Ceremony : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. अभिनेत्री समंथा रूथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाला आपली जीवनसाथी बनवणार आहे. नागा आणि शोभिता यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अशातच आता दोघांच्या हळदी सोहळ्याचा व्हिडिओ समोर आला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदीचा सोहळा शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि जवळचे लोक उपस्थित होते. आता हळदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शोभिताने तिच्या हळदी फंक्शनमध्ये दोन आउटफिट्स परिधान केले होते. सर्वप्रथम ती लाल रंगाची साडी परिधान करून नागा चैतन्यसोबत खुर्चीवर बसलेली दिसत आहे. शोभिताने लाल रंगाची साडी परिधान केली असून, तिने तिच्या केसांची बन हेअरस्टाईल केली आहे आणि सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. तर, पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान करून नागा चैतन्य खूपच छान दिसत आहे.

रंगली शोभिताची चर्चा!

दुसऱ्या आउटफिटबद्दल बोलायचे झाले, तर शोभिताने मुख्य हळदी फंक्शनमध्ये पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या साडीच्या ऑफ शोल्डर ब्लाऊजमुळे ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा क्वीन लूक खूप पसंत केला जात आहे. या व्हिडिओमध्ये शोभिता एका मोठ्या हळदीच्या भांड्यात बसली आहे. तर, लोक तिच्यावर पाणी आणि फुलांचा वर्षाव करत आहेत. यावेळी शोभिताच्या चेहऱ्यावर या क्षणाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.

Sobhita Dhulipala: नागा चैतन्यशी नाव जोडलेल्या शोभिता धुलिपालाचे क्साली फोटोशूट

नेटफ्लिक्सला विकले हक्क?

हळदी समारंभात नागा चैतन्य कुर्ता पायजमामध्ये दिसला होता. हळदीच्या काही सर्वोत्तम क्षणांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. लग्नाच्या काही दिवस आधी अशी अफवा पसरली होती की, या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्सला ५० कोटींना विकले होते. मात्र, नागा चैतन्यने या वृत्ताचे खंडन केले आणि झूमशी केलेल्या संभाषणात सांगितले की, ‘ही खोटी बातमी आहे. असा कोणताही करार झालेला नाही.’ नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला २०२२पासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याने ८ ऑगस्ट २०२४ रोजी हैदराबादमध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता.

Whats_app_banner