दक्षिणेकडील सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा, अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रूथ प्रभूच्या घटस्फोटाबाबत एक खुलासा समोर आला आहे. समंथापासून घटस्फोट घेण्यासाठी त्याची दुसरी पत्नी सोभिता धुलिपाला कारणीभूत होती, अशा चर्चा होत्या. परंतु 'रॉ टॉक्स विथ व्हीके पॉडकास्ट'मध्ये एका मुलाखतीत नाग चैतन्यने यावर खुलासा केला आहे. सोभिता धुलिपाला सोबतचे नुकतेच झालेले लग्न आणि त्यापूर्वी समंथा रूथ प्रभूपासून घेतलेला घटस्फोटाबद्दल त्याने मोकळेपणाने सांगितले आहे. सोभिताचा सामंथासोबतचे माझे आधीचे लग्न मोडण्याशी सोभिताचा काहीही संबंध नव्हता, त्या केवळ अफवा आहेत असं नाग चैतन्य म्हणाला.
नागा चैतन्य म्हणाला, ‘या प्रकरणात सोभिताला ओढले जात असल्याबद्दल मला वाईट वाटते. तिचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि तिचा काहीही दोष नाही. ती अतिशय नैसर्गिक पद्धतीने माझ्या आयुष्यात आली. आम्ही सोशल मीडियावर गप्पा मारल्या, सहज भेटलो आणि तिथूनच आमचं नातं घट्ट झालं. ती माझ्या भूतकाळच्या आयुष्याशी अजिबात जोडली गेली नव्हती. त्यामुळे जेव्हा लोक तिच्याबद्दल चुकीचे बोलतात तेव्हा मला वाईट वाटते. तिला यात ओढणं अत्यंत चुकीचं आहे.’ असं नाग चैतन्य म्हणाला.
मात्र, या प्रकरणावर चर्चा सुरू असताना सोभिताने समजूतदारपणा, संयम आणि प्रगल्भता दाखवली. घटस्फोटाविषयी बोलताना चैतन्य म्हणाला की मी स्वत:ला एक तुटलेल्या कुटुंबात वाढलेलं मूल आहे. त्यामुळे कोणतेही नाते तोडण्यापूर्वी मी हजार वेळा विचार करेन. घटस्फोटाचा निर्णय हा समंथा आणि माझ्यातला परस्पर घेतलेला निर्णय होता. ही काही एका रात्रीत घडलेली गोष्ट नाही. जे काही घडलं त्याचं मला वाईट नक्की वाटतं. पण प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक कारण असतं.
अभिनेता नाग चैतन्य हा दक्षिणेतला सुपरस्टार अभिनेता नागार्जुनचा मुलगा आहे. नागार्जुनने १९८४ साली दक्षिणेतला अभिनेता व्यंकटेश याची बहीण लक्ष्मी दग्गुबाती हिच्याशी लग्न केले होते. नाग चैतन्य हा अभिनेता नागार्जुन आणि लक्ष्मी यांचा मुलगा आहे. त्यानंतर नागार्जुनने लक्ष्मीसोबत घटस्फोट घेऊन १९९२ साली अमला अक्किनेनी हिच्याशी लग्न केले होते. नागार्जुन आणि अमला यांचा अखिल अक्किनेनी नावाचा मुलगा असून तो दक्षिणेतील सिनेमांमध्ये अभिनय करतो. नाग चैतन्यने २०१७ मध्ये समंथा रूथ प्रभूशो लग्न केले होते. २०२१ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर नाग चैतन्यने २०२४ साली मॉडेल, अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत लग्न केले आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्टडी' आणि 'धूता' या वेब सीरिजमध्ये नागा चैतन्यने अभिनय केला होता. या महिन्यात प्रदर्शित झालेला चंदू मोंदेती दिग्दर्शित 'थंडेल' या चित्रपटातली नाग चैतन्याच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होत आहे. या सिनेमाने पहिल्या पाच दिवसांत जगभरात ८० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
संबंधित बातम्या