Naga Chaitanya: समंथाचा नवरा दुसरं लग्न करतोय! ‘या’ अभिनेत्रीसोबत साखरपुडाही झाला! समोर आला पहिला फोटो-naga chaitanya and sobhita dhulipala are engaged first pics out from ceremony ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naga Chaitanya: समंथाचा नवरा दुसरं लग्न करतोय! ‘या’ अभिनेत्रीसोबत साखरपुडाही झाला! समोर आला पहिला फोटो

Naga Chaitanya: समंथाचा नवरा दुसरं लग्न करतोय! ‘या’ अभिनेत्रीसोबत साखरपुडाही झाला! समोर आला पहिला फोटो

Aug 08, 2024 01:43 PM IST

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी अंगठ्यांची देवाणघेवाण करत साखरपुडा केला आहे. याची माहिती नागार्जुन यांनी ट्विटरवरून दिली आहे.

Naga Chaitanya, Sobhita Dhulipala are engaged, first pics out; Nagarjuna blesses couple
Naga Chaitanya, Sobhita Dhulipala are engaged, first pics out; Nagarjuna blesses couple

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा झाला आहे. नाग चैतन्यचे वडील, साऊथ स्टार नागार्जुन यांनी या खास सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधून दिसत आहे की, या जोडप्याने आपल्या नात्याची नवी जोरदार सुरुवात केली.

नागार्जुनने सोशल मीडियावर लिहिले की, ‘आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सुखी जोडप्याचे अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंद मिळो, अशी शुभेच्छा. देव आशीर्वाद दे! ८.८.८ अनंत प्रेमाची सुरुवात.’

रॉयल लूकमध्ये दिसली जोडी!

फोटोंमध्ये शोभिता सुंदर पीच सिल्क साडी आणि पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांमध्ये दिसत आहे. तिचे केस अबोली रंगाच्या फुलांनी सजलेले दिसत आहेत. तर, चाय आपल्या ऑल व्हाईट आउटफिटमध्ये रॉयल दिसत आहे. या जोडप्याच्या चाहत्यांनी दोघांना आशीर्वाद दिले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, "खूप खूप अभिनंदन. चाय आणि अक्किनेनी कुटुंबाला शुभेच्छा’. दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अक्किनेनी फॅमिलीचे अभिनंदन.’

नागार्जुनची पत्नी अमला अक्किनेनी आणि चैतन्यचा भाऊ अखिल हा साखरपुडा समारंभात धुलिपालाच्या आई-वडिलांसोबत उपस्थित होता, अशी माहिती चैतन्य याच्या जवळच्या सूत्रांनी दिली. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स या उच्चभ्रू ठिकाणी नागार्जुन आणि कुटुंबीय एका आलिशान घरात राहतात. तेलुगू चित्रपट चाहत्यांसाठी हे घर मैलाचा दगड आहे.

Dada Kondke: काय होता दादा कोंडके यांच्या कॉमेडीचा खास मंत्र? महेश कोठारे यांनी थेट सांगूनच टाकलं गुपित!

समंथाशी घटस्फोट!

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नागाच्या 'दुसऱ्या लग्ना'च्या अफवा समोर आल्या होत्या. यापूर्वी त्याने सामंथा रूथ प्रभू यांच्याशी लग्न केले होते. २०२१ मध्ये ते विभक्त झाले होते. २०१७मध्ये नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. परंतु, त्यांचे नाते काही वर्षेच टिकले. २०२१मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. शोभितासोबतच्या आणि नागाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर नागाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. तर, समंथाचे चाहते संतापलेले दिसले आहेत. समंथा आणि नागाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दरम्यान ते प्रेमात पडले होते. चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडायची. मात्र, त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांना धक्का दिला होता.