झी मराठी वाहिनीवीरील अतिशय लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीम गाठ'ने सर्वांची मने जिंकली होती. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांची मुलगी परीची भूमिका मायरा वायकुळने साकारली होती. या छोट्या मायराने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या पहिल्यावहिल्या मालिकेने मायराला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. आता मायरा एका चित्रपटात काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मायरा अभिनेता प्रथमेश परबसोबत दिसणार आहे.
मायरा वायकुळच्या आगामी सिनेमाचे नाव 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' असे आहे. या चित्रपटाचे नुकताच पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टवर मायरा अतिशय क्यूट दिसत आहे. मायरा एका गावाच्या बाहेर उभी असलेली दिसत आहे. तसेच तिच्या हातात फुगा आहे आणि त्या भुग्याला पत्र अडकवलेले दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर मायराच्या या नव्या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.
'मुक्काम पोस्ट देवाचं घर ' या मालिकेत जरा हटके कथा पाहायला मिळणार आहे. मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. मायरा कोणाच्या तरी पत्राची वाट पाहात आहे. आता ती कोणाच्या पत्राची वाट पाहात आहे ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच प्रथमेश परब हा मायराच्या भावाची भूमिका साकारणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ' मुक्काम पोस्ट देवाचं घर ' या चित्रपटात मायराच्या वाट्याला आलेली भूमिका काय आहे ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहाता चाहते मायराच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या