खून, बदला आणि रहस्यमय घटना; 'काकुळ' या थरारक मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  खून, बदला आणि रहस्यमय घटना; 'काकुळ' या थरारक मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!

खून, बदला आणि रहस्यमय घटना; 'काकुळ' या थरारक मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!

Published Jun 22, 2024 09:13 AM IST

एक नवाकोरा रहस्यमय, हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. ‘काकुळ’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

खून, बदला आणि रहस्यमय घटना; 'काकुळ' या थरारक नव्या मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!
खून, बदला आणि रहस्यमय घटना; 'काकुळ' या थरारक नव्या मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!

सध्या सर्वत्र कौटुंबिक, रोमँटिक चित्रपटांची चलती असलेली पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकवर्ग रहस्यमय चित्रपटांना मिस करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. मात्र, आता प्रेक्षकांची हीच इच्छा लवकरचं पूर्ण होणार आहे. कारण, एक नवाकोरा रहस्यमय, हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. ‘काकुळ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. खून, अपहरण आणि बदला याचे चित्रण चित्रपटात केले असल्याचं पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या ‘काकुळ’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून या चित्रपटातील थरार दिसत आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री मोनालीसा बागल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. पोस्टरवरील या अभिनेत्रीच्या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. रक्ताने माखलेला चेहरा चित्रपटाची रहस्यमय असलेली खोली दर्शवतंय. चेहऱ्यावरील जखमा, गळा दाबून घेतलेला जीव अशा या द्विधा मनस्थितीत टाकणाऱ्या पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. 'स्वप्निल गोगावले फिल्म्स' अंतर्गत 'काकुळ' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वप्निल विजया सहदेव गोगावले यांनी साकारली, सहनिर्माते म्हणून राजीव दत्तात्रय पाटील, सोमा दास यांनी बाजू पाहिली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सूरज रघुनाथ पडवळ यांनी केले आहे.

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात एन्ट्री; चाहतीसोबत केलं लग्न! थलापती विजयबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मोनालीसा बागलसह या चित्रपटात यश डिंबळे, विवेक यादव पाटील, मयूर भोसले हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या थरारक चित्रपटातील गाण्यांचं उदय देशपांडे यांनी संगीत केलं आहे. तर संपूर्ण चित्रपट वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. अशा या हॉरर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आली नसून लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार आहे एवढं नक्की. मोनालीसा बागल हिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.

मोनालीसाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

या आधी अभिनेत्री मोनालीसा बागल हिने अनेक चित्रपटांसोबतच काही मालिकांमध्येदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे. मोनालीसा बगल होणे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकून घेतलं आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातील तिचा अभिनयाला प्रेक्षकाची पसंती मिळाली होती. आता पुन्हा एकदा मोनालीसामोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे कळताच तिचे चाहते आतुर झाले आहेत. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाय आहेत.

Whats_app_banner