मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Munmun Dutta Bday: एका रात्रीसाठी किती पैसे घेते?; मुनमुनला विचारताच संतापली

Munmun Dutta Bday: एका रात्रीसाठी किती पैसे घेते?; मुनमुनला विचारताच संतापली

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 28, 2022 09:55 AM IST

Munmun Dutta: मूनमूनचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

मूनमून दत्ता
मूनमून दत्ता (HT)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. ही मालिका गेली चौदा वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्र सतत चर्चेत असतात. बबिताने तर प्रेक्षकांना घायाळ केले आहे. आज बबिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुनता दत्ताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

मूनमून ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तिचे लाखो चाहते आहेत. मूनमूनच्या फोटो आणि व्हिडीओची ते वाट पाहात असतात. काही चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. तर काही तिला ट्रोल देखील करतात. एका यूजरने मूनमूनला धक्कादायक प्रश्न विचारला होता. मूनमून देखील शांत बसली नाही. तिने त्या यूजरला चांगलेच सुनावले.
वाचा: राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेतील त्या कृतीमुळे जॉनी लिव्हर ट्रोल, VIDEO VIRAL

एका यूजरने मूनमूनला 'एका रात्रीसाठी किती पैसे घेते' असा प्रश्न विचारला होता. त्यावर मूनमूनने, 'काय रे तू तुझ्या मर्यादा विसरलास का? देवाने तुला इतके वाईट तोंड दिले आहे की तुझ्या तोंडून एकही चांगली गोष्ट निघत नाही. समोर येऊन माझ्याशी बोल. आणि हा, ब्लॉक करण्याआधी तुला तू कोण आहेस याची जाणीव करुन देते. निघ आता. हे असे विचित्र माझ्यासमोर वागू नकोस' या आशयाची कमेंट केली होती.

IPL_Entry_Point

विभाग