काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'मुंज्या' या हॉरर कॉमेडी चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अभय वर्माने नुकताच एका मुलाखतीत मुंबईतील सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. त्याने सांगितले की, एकदा तो एका बैठकीसाठी गेला होता आणि त्याला तिथल्या कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले होते. या घटनेनंतर तो मुंबईहून हरयाणातील आपल्या घरी परतला होता. मात्र, नंतर त्याला वाटले की, आपला प्रवास सांगण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही. त्यानंतर तो मुंबईत परतले.
अभयने नुकतीच इन्स्टंट बॉलिवूड मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असताना, करिअरच्या सुरुवातीला त्याने पहिल्यांदा कुणाला तरी नाही म्हटले होते. आपल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला सुरुवातीला तो इतका भोळा होता की त्याला काहीच समजत नव्हते चूक काय आहे आणि बरोबर काय आहे. सतत इतर लोक त्याला सल्ला देत होते आणि तो ऐकत होता.
"एकदा असं झालं आणि नंतर मी म्हणालो की मी माझा टीव्ही रिमोट इतरांना खेळण्यासाठी आणि चॅनेल बदलण्यासाठी का द्यावा. हे माझं आयुष्य आहे आणि हेच माझं ध्येय आहे. मी पानिपतला जाऊन माझी स्वप्ने चिरडून टाकली, मी तसे होऊ दिले नाही" असे अभय म्हणाला. पुढे तो बदललेल्या स्वभावाविषयी बोलताना म्हणाला, "हा माझा प्रवास आहे आणि मी प्रवास कसा करायचा हे सांगण्याचा अधिकार कुणालाही नाही."
वाचा: ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अभय वर्माच्या कामाविषयी बोलाचे झाले तर त्याचा २०२३मध्ये सफेद हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यामातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो ट्रांसजेंडच्या भूमिकेत दिसला होता. पण त्याला खरी ओळख मुंज्या चित्रपटाने मिळवून दिली. त्याचा हा चित्रपट हिट ठरला.