‘बिग बॉस १७’चा विजेता, कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवाला यांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यानंतर, आता या जोडप्याचे केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल हसताना आणि सेलिब्रेशनमूडमध्ये दिसत आहे.
पापा राझी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर मुनव्वर आणि मेहजबीनचा केक कापतानाचा फोटो शेअर करत दावा केला की, "#MunawarFaruqui आणि दुसरी पत्नी #MehzabeenCoatwala यांचा लग्नानंतर केक कापतानाचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे.' या फोटोत मुनव्वर पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून दिसत आहे, तर मेहजबीन लव्हेंडर सूटमध्ये सुंदर दिसत आहे. फुलांच्या पाकळ्या असलेला पांढरा केक त्यांनी कापला आहे. मात्र, हे जोडपे विवाहित आहे की नाही आणि हा फोटो कधी काढण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुनव्वरच्या चाहत्यांनी मात्र तो विवाहित असल्याचे म्हटले आहे. त्याने दुसरे लग्न केल्याचा दावा चाहतेही करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, "#MunawarFaruqui भाईला त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! या जोडप्याचा पहिला फोटो आता समोर आला आहे.' आणखी एकाने लिहिले की, ‘माशाअल्लाह! तुम्ही दोघं एकत्र खूप सुंदर दिसत आहात.’ आणखी एका चाहत्याने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, ‘तुमचे प्रेम दिवसागणिक दृढ होत जावो, तुम्हाला पुढील सुंदर प्रवासासाठी शुभेच्छा आणि आपल्या लहान मुलांसह -मेहजबीनची मुलगी आणि मुनव्वरचा मुलागा या कुटुंबासह सुखी आयुष्य जगा!’
सोमवारी मुनव्वरने दुसरे लग्न केल्याची अफवा पसरली होती. टाइम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ‘होय, मुनव्वर आता विवाहित आहे. त्याचे लग्न झाले आहे. मात्र, त्याला ते लपवून ठेवायचे आहे; त्यामुळे या दोघांचे कोणतेही फोटो समोर येणार नाहीत.’ त्यांच्या हा लग्न सोहळा अत्यंत खाजगी असल्याने या सोहळ्याला केवळ या जोडप्याचे निकटवर्तीय उपस्थित होते, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुनव्वरचे दोन आठवड्यांपूर्वी लग्न झाले होते. रविवारी मुंबईच्या आयटीसी ग्रँड मराठा येथे त्याने आणि त्याच्या नववधूने लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होते.
मुनव्वरने यापूर्वी जॅस्मिनसोबत केले होते, ज्यापासून त्याला सहा वर्षांचा मुलगा मिकेल आहे. कंगना रणौतच्या 'लॉक अप' या शोमध्ये त्याने पहिल्यांदा आपल्या कुटुंबाबद्दल सांगितले होते. ‘बिग बॉस १७’मध्ये भाग घेताना त्याने मन्नारा चोप्रालाही आपल्या मुलाबद्दलही सांगितले होते. तो म्हणालेला की, ‘मी गेल्या दोन वर्षांपासून कोणासोबत तरी आहे. मी २०१७मध्ये लग्न केलं होतं. आणि २०२०मध्ये आम्ही वेगळे झालो. गेल्या वर्षी आमचा घटस्फोट निश्चित झाला होता. या सगळ्यात माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझा मुलगा. तो सहा वर्षांचा आहे आणि माझ्यासोबत राहतो.’ दुसरीकडे, मेहजबीनला देखील आधीच्या लग्नातून एक मुलगी आहे.
संबंधित बातम्या