mrs india empress of the nation : शारीरिक सौंदर्य, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि डिजिटल युगातही मनात सतत असलेली सामाजिक जाणीव… अशा त्रिवेणी गुणांचं प्रतिबिंब असलेल्या दिवा ब्युटी पेजेंट्स मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन अर्थात राष्ट्रीय सौभाग्यवती सौंदर्य स्पर्धेत मुंबईकर सोनाली देशमाने हिनं बाजी मारली आहे. या स्पर्धेत तिनं 'रिफ्रेशिंग ब्यूटी आणि डिजिटल क्वीन' हे दोन पुरस्कार पटकावले आहेत.
भारताच्या कानकोपर्यातून आलेल्या ५४ सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मुंबईच्या सोनालीनं आपला वाकचातुर्य व बौद्धिक कौशल्याच्या जोरावर यात बाजी मारली. पुण्यातील हयात हॉटेलमध्ये नुकतीच ही स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली.
चार दिवस रंगलेल्या या दिवा पेंजेट्सच्या सौंदर्य स्पर्धेत स्पर्धकांना सुंदर दिसण्यासह उत्कृष्ट सादरीकरण, हजरजबाबीपणा, रॅम्पवॉक, आत्मविश्वासपूर्ण संवाद साधण्याची कला कशी जोपासायची व आत्मसात करायची याचंही प्रशिक्षण देण्यात आलं होतं. दिवा पेजेंट्सचे आधारस्तंभ असलेल्या अंजना आणि कार्ल मस्करेन्हास यांनी हे अत्यंत मनापासून ही जबाबदारी पार पाडली.
स्त्रिच्या बाह्यरंगाबरोबर अंतरंग खुलवणार्या या स्पर्धेला मुंबई, पुण्यासह भारतातील अनेक छोट्या-मोठ्या शहरातून सौंदर्यवतींनी हजेरी लावली. सर्वच स्पर्धकांनी आपल्याकडी अनोखे कला-कौशल्य सादर करत दिग्गज परीक्षकांना चकीत केले. अवघ्या विशीपासून ते साठी गाठलेल्या ब्युटी क्वीन्सचा या स्पर्धेतील सहभाग मन प्रसन्न करणारा होता.
एकापेक्षा एक अशा स्पर्धकांमधून अंतिम विजेत्यांची निवड करणं हे मोठं आव्हान होतं. मात्र, सिने अभिनेत्री इशा कोप्पीकर, मेघना नायुडू, हायत हॉटेलचे संदीप सिंग, डॉ. लीना गुप्ता या परीक्षकांच्या पॅनलनं ही आव्हान यशस्वीरित्या पेललं.