मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एक-दोन नव्हे, अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले ६ आलिशान फ्लॅट! किती पैसे मोजले माहित्येय का?

एक-दोन नव्हे, अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले ६ आलिशान फ्लॅट! किती पैसे मोजले माहित्येय का?

Jun 19, 2024 01:31 PM IST

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने बोरिवली परिसरातील ओबेरॉय रियॅल्टी स्काय सिटी प्रकल्पात ४,८९४ चौरस फुटांचे सहा फ्लॅट खरेदी केले आहेत.

एक-दोन-तीन नव्हे, अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले सहा आलिशान फ्लॅट! 
एक-दोन-तीन नव्हे, अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले सहा आलिशान फ्लॅट! 

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने मुंबईतील बोरिवली परिसरातील ओबेरॉय रियॅल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पात १५.४२ कोटी रुपयांना सहा फ्लॅट खरेदी केले आहेत, अशी माहिती Zapkey.com या वेबसाईटकडून देण्यात आली आहे. कागदपत्रांनुसार, बॉलिवूड अभिनेत्याने ३१,४९८ रुपये प्रति चौरस फूट दराने एकूण ४,८९४ चौरस फूट रेरा कार्पेटचे हे फ्लॅट खरेदी केले आहेत. बोरिवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर हे सहा अपार्टमेंट आहेत. २८ मे २०२४ रोजी या सहा अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली असून, त्यात १० कार पार्किंगची सुविधा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Instagram Money Earning: इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवण्यासह लाखो रुपये कमवायचे आहेत? ‘या’ टीप्स करा फॉलो!

सहा फ्लॅटपैकी दोन फ्लॅट २५२ चौरस फूट, दोन फ्लॅट सुमारे ११०० चौरस फूट (कार्पेट) आणि उर्वरित दोन फ्लॅट १०९४ चौरस फूट क्षेत्रफळाचे आहेत. अभिषेक बच्चनने ज्या इमारतीत सहा फ्लॅट खरेदी केले आहेत, त्या इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, मे २०२४ पर्यंत ओबेरॉय रियॅल्टीने ओबेरॉय स्काय सिटी प्रकल्पात कंपनीकडून बांधण्यात येत असलेल्या एकूण २८.५४ लाख चौरस फुटांपैकी २४.२२ लाख चौरस फुटांचे बुकिंग पूर्ण केले होते.

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटातून मिळणारा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी! निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

अभिषेककडून अधिकृत प्रतिक्रिया नाही!

अभिषेक बच्चन याच्या घर खरेदीच्या वृत्तावर अद्याप ओबेरॉय रियॅल्टीकडून काहीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तर, अभिषेक बच्चन याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

गुंतवणुकीत अभिषेकही ठेवतोय वडिलांच्या पावलावर पाऊल!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मालमत्तेत गुंतवणूक करण्याची आवड आहे. वडिलांप्रमाणेच अभिषेकलाही गुंतवणूक करण्याची आवड आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने यापूर्वीही ओबेरॉय रियॅल्टीने बांधलेल्या अपार्टमेंटमध्ये गुंतवणूक केली आहे. अभिषेक बच्चन याने ऑगस्ट २०२१मध्ये वरळीतील ओबेरॉय रियॅल्टीच्या ‘ओबेरॉय ३६० वेस्ट’ या प्रकल्पातील मुंबईतील एक अपार्टमेंट ४५.७५ कोटी रुपयांना विकले होते. हा फ्लॅट त्याने २०१४ मध्ये ४१ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

याच इमारतीत बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर यांचेही अपार्टमेंट आहे. ‘डीमार्ट’चे मालक राधाकिशन दमाणी, त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी फेब्रुवारी २०२३मध्ये या प्रकल्पातील काही फ्लॅट १,२३८ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

WhatsApp channel