मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक

Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 28, 2024 09:52 AM IST

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन अभिनेता साहिल खान याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर मोठी कारवाई केली जात आहे.

actor sahil khan arrested
actor sahil khan arrested

महादेव बेटिंग अॅपचा प्रचार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. सध्या साहिल खानची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात काही माहिती समोर येते का हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या प्रकरणात आणखी बॉलिवूड कलाकार तर सामिल नाहीत ना? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
वाचा: चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई पोलिसांनी कारवाई करताच अभिनेता साहिल खानने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केला होता. पण न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. माटुंग्यामधील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी महादेव ऑनलाइन गेमिंग बेटिंग अॅप विरोधात माटुंग्या पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर जवळपास ३१ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर "द लायन बुक ॲप" नावाच्या एका ॲपमध्ये अभिनेता साहिल खान भागिदारीत असल्याचे कळताच पोलिसांनी कारवाई केली.
वाचा: ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात गैरव्यवहार

मुंबई पोलिसांना या प्रकरणात गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी चौकशी सुरु केली. त्यामध्ये एकूण १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर आली होती. या प्रकरणात ईडीने मालमत्ता जप्तीची देखील कारवाई केली. त्यामुळे अभिनेता साहिल खानला ताब्यात घेण्यात आले आहे.
वाचा: 'बाईपण भारी देवा' सिनेमा घरबसल्या पाहायला? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

साहिल खान मुंबईतून झाला होता फरार

साहिल खानची अटकपूर्व जामिन याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. तो मुंबईतून निघून गोवा, कर्नाटक, हैदराबाद असा प्रवास करत छत्तीसगढमध्ये पोहोचला होता. मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर होते. अखेर आज छत्तीसगढमधील जगदलपुर येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणी आणखी कोणत्या कलाकारांची किंवा काय माहिती समोर येते हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड

IPL_Entry_Point

विभाग