मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bless You: मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची ओढाताण दाखवणारा ‘ब्लेस यू’

Bless You: मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची ओढाताण दाखवणारा ‘ब्लेस यू’

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 22, 2022 04:42 PM IST

या चित्रपटाने भूतानमध्ये ड्रक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२२मध्ये बाजी मारली आहे.

ब्लेस यू
ब्लेस यू (HT)

दिग्दर्शक संजय सुरे यांचा 'ब्लेस यू' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा मुंबईत नुकताच प्रीव्ह्यू पार पडला. या प्रीव्ह्यूला दिग्गजांनी आणि समिक्षकांनी हजेरी लावली होती. इतकच काय तर समिक्षकांनी उत्स्फूर्त दाद देखील दिली. या चित्रपटाने भारताबाहेरही काही फिल्म फेस्टिवलमध्ये नाव कमावले आहे. या चित्रपटाची कथा ही सर्वसामान्य माणसांना अगदी त्यांच्या जवळची वाटेल.

'ब्लेस यू' या चित्रपटात मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची ओढाताण दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची कथा सदानंद नावाच्या एका सराकरी कारकुनाची आहे. तो रविवारी कुटुंबासोबत बाजारात जातो, खरेदी करतो आणि नंतर रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या एका गाडीवर जाऊन बर्फाचा गोळा खातो. तो खात असताना सदानंदला शिंक येते आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. एकंदरती चित्रपटाची कथा ही गमतीदार असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
वाचा: ‘बुरखा परिधान कर आणि...', लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख सर्वांसमोर गौरीला म्हणाला अन्...

‘ब्लेस यू’ चित्रपटातील अनेक सीन्स हे मुंबईतील रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये शूट झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राहाणारा सामान्य माणूस अगदी सहज चित्रपटाशी जोडला जातोय. यासोबतच सरकारी कार्यालयाचे बारकावे, मध्यमवर्गीय कुटुंबीयांची ओढाताण अत्यंत बारकाईने व गंमतशीर पद्धतीने सादर करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात मनिष कुमार आणि अंकिता मुसाई हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर मोहनीश कल्याण खलनायकाच्या भूमिकेत आहे.

न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ४५व्या एशियन अमेरिकन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२२मध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमीयर पार पडला. त्यानंतर भूतानमध्ये ड्रक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२२मध्ये ‘ब्लेस यू’ने बाजी मारली. तसेच टोकियो, पौस आणि इतर काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाची निवड झाली आहे. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग