Subhash Ghai: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडली, मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subhash Ghai: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडली, मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल

Subhash Ghai: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडली, मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल

Dec 08, 2024 07:07 AM IST

Subhash Ghai Hospitalised: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडली
चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडली

Subhash Ghai Admitted To Lilavati Hospital: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी सायंकाळी श्वसनाचा त्रास, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे आणि बोलण्यात अडचण येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिक आहे.

सुभाष घई हे सध्या ७९ वर्षाचे आहेत. ताज्या माहितीनुसार, ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले आहेत. ‘काळजी करण्यासारखे काही नाही. सुभाष घई यांच्या बिझी शेड्यूलमुळे आम्ही दरवर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करतो, जेणेकरून डॉक्टरांना सर्व वैद्यकीय चाचण्या व्यवस्थित करता येतील. ते पूर्णपणे ठीक आहेत’, असे सूत्रांनी एएनआयला सांगितले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सुभाष घई यांना सुरुवातीपासूनच अभिनेता व्हायचे होते. पण त्याच्या नशिबाचे चाक असे फिरले की, अभिनेता होण्यासाठी बाहेर पडलेल्या सुभाष घई यांनी कितीतरी कलाकारांना सुपरस्टार बनवले. राज कपूर यांच्यानंतर सुभाष घई हे बॉलिवूडचे दुसरे शोमॅन मानले जातात. सुभाष घई यांनी आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत सुमारे १६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यापैकी १३ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. २००६ मध्ये 'इक्बाल' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सुभाष घई यांचा शेवटचा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला '३६ फार्महाऊस' होता ज्यात त्यांनी लेखक आणि निर्मात्याची भूमिका साकारली होती. याआधी २०१५ मध्ये त्यांनी हिरो नावाचा चित्रपटही बनवला होता. गेल्या काही वर्षांपासून कथा लिहिण्यात आणि चित्रपट निर्मितीत ते विशेष सक्रिय नसले तरी मनोरंजन सृष्टीतील त्यांचे योगदान थांबलेले नाही. सुभाष यांनी घई व्हिसलिंग स्कूल नावाची अभिनय संस्था सुरू केली, जिथे ते नवीन कलाकारांना अभिनय शिकवतात आणि त्यांना मनोरंजन उद्योगात करिअर करण्यास मदत करतात.

Whats_app_banner