सध्या सर्वत्र 'अॅनिमल' या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना अभिनेता कुणाल ठाकूर नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. त्याने मुक्ती मोहनशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
कुणाल ठाकूर आणि निती मोहनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये निती मोहन वधूच्या लूकमध्ये दिसत असून तिची वरात दिसत आहे. त्यानंतर मांडवात नवरदेवाची एण्ट्री होताना दिसते. दरम्यान, दोघेही अतिशय सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. त्यांच्या लग्नातील इतर विधींचे देखील व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओंवर अनेक कलाकार आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
वाचा: ए-रेटेड सिनेमे जे थिएटरमध्ये झाले हिट, पाहा ओटीटी प्लॅटफॉर्मवर
कुणाल कपूरने व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. 'आम्ही आमच्या लग्नातील काही आनंदाचे क्षण तुमच्या सोबत शेअर करत आहोत. जेणेकरुन तुमचा आशिर्वाद आम्हाला मिळेल. तुम्हा सगळ्यांचे आभार. अमेरिकेशी संबंध जोडण्यासाठी आई, बाबा, मम्मी, पप्पा, निहार, निती, कृती, शक्ती, नितीन, तिथी, पार्थ, पापाजी, मल्लो आर्यवीर, ठाकूर, शर्मा आणि पंड्या परिवाराचे आभार' अशी आभार मानणारी पोस्ट कुणालने टाकली आहे.
निती मोहन, शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन यांना ओळखत नाही असे कोणी नाही. एक बहिण सिंगिंगमध्ये सुपरस्टार आहे तर बाकी दोन बहिणी अभिनेत्री आणि डान्सर आहेत. तर कुणाल एक अभिनेता आहे. त्याने कबीर सिंह, कसौटी जिंदगीमध्ये काम केले आहे.