मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2024 02:36 PM IST

आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या तिच्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’
परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे हिचे नाव आवर्जून घेतले जाते. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या तिच्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील मुक्ताच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. सध्या मुक्ता बर्वे तिच्या ‘चारचौघी’ नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात असून, तिला सध्या भारताची आठवण येत आहे. यानिमित्ताने तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

या पोस्टमध्ये मुक्ताने लिहिलं की, ‘तुम्हाला माहित आहे, मी आत्ता भारतात नाहीये… कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल की, माझ्या फिल्मच्या रिलीजला मी नाही. त्यामुळे ‘नाच गं घुमा’ रिलीज झाल्यापासून मला ना एक अस्वस्थ फिलिंग येतंय… ते म्हणजे १ मे ला फिल्मी तर रिलीज झाली… आणि आम्ही कलाकृती यासाठीच बनवतो की, ती प्रेक्षकांनी बघावी… आणि भरभरून प्रेम द्यावं… आणि… प्रेक्षक सिनेमा बघून कौतुकाने आम्हाला डोक्यावर घेत ही आहेत… पण हे सर्व मी फिल्म बघण्या आधीच होतंय..! चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे… प्रेक्षक कौतुक करत आहेत, पण मी अजून फिल्म पाहिलीच नाहीये… आणि मला त्याची रुखरुख वाटते आहे. पण, हरकत नाही… माझ्या नाटकावर माझ प्रेम आहे… तीही माझी कमिटमेंट आहेत आणि मी इकडे माझ्या चारचौघी नाटकाचे दौरे अगदी उत्साहाने करते आहे… पण मनाने कुठेतरी मी भारतातही आहे माझ्या टीम सोबत… माझ्या प्रेक्षकांबरोबर… माझ्या मराठी माणसांबरोबर..!’

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

पुढे मुक्ताने लिहिले, ‘त्यामुळे आता मी खूप आतुर आहे की, कधी मला माझीच फिल्म (म्हणजे आपली फिल्म) थिएटर जाऊन तुम्हा सर्वांसोबत बघता येईल..! इथले सर्व प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडून मी लवकरच भारतात येतेय… जी काही कमी राहिली आहे माझ्या अनुपस्थितीममुळे… ती मी भरून काढणार आहे..! १२ मे पासून आहेच तुमच्याबरोबर… भेटूया आणि मज्जा करूया… तोपर्यंत थेटरात ‘घुमोत्सव’ असाच उत्साहात साजरा होत राहू दे..! ‘नाच गं घुमा’ तुमच्या भेटीला १ मे पासून आलेला आहे आणि तो तुम्ही पहिला असेल… पण ज्यांनी नाही पाहिला त्यांनी पाहिलं तिकिट काढा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमिटमेंट, रील्स, स्टोरीद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा.’

IPL_Entry_Point