आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?

आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 18, 2025 02:42 PM IST

सध्या सोशल मीडियावर बालकलाकार मायरा वायकुळच्या 'मुक्काम पोस्ट देवाचं' घर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते भावूक होताना दिसत आहेत.

Mukkam Post Devach Ghar
Mukkam Post Devach Ghar

आज कालच्या तंत्रज्ञानाच्या जगात कोणीही एकमेकांना पत्र लिहित नाही. सर्वजण मोबाईल काढतात आणि एकमेकांशी फोनवर किंवा मेसेजवर संवाद साधतात. त्यामुळे पत्र लिहिणे फारच दुर्मिळ झाले आहे. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने एका चिमुकलीचे पत्र तिच्या देवाघरी गेलेल्या बाबाकडे कसे पाठवता येईल याविषयावर सिनेमा आणला आहे. या सिनेमाचे नाव 'मुक्काम पोस्ट देवाचं' असे आहे. या चित्रपटाचा भावनिक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून उलगडणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

"मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून "सुंदर परिवानी" ह्या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
वाचा: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?

कोणते कलाकार दिसणार?

"मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner