मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'स्वतःला स्टार समजणाऱ्या...', तापसीच्या बॉयकॉटबद्दलच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना

'स्वतःला स्टार समजणाऱ्या...', तापसीच्या बॉयकॉटबद्दलच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 23, 2022 04:44 PM IST

mukesh khanna targeted taapsee pannu: मुकेश खन्ना यांनी तापसी पन्नू आणि अर्जुन कपूर यांच्यावर निशाणा साधला आहे. दोघांनी त्यांच्या मुलाखतीत बॉयकॉटबद्दल वक्तव्य केलं होतं.

मुकेश खन्ना
मुकेश खन्ना

शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना सध्या आपल्या कामापेक्षा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. मुकेश त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांचे विचार शेअर करत असतात. त्यांच्या काही वक्तव्यावरून अनेकवेळा वादही झाले. आता बॉलिवूडवर टाकण्यात येणाऱ्या बहिष्काराच्या ट्रेंडवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान त्यांनी तापसी पन्नूवर निशाणा साधला आहे. तापसी बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. 'दोबारा'च्या प्रमोशनदरम्यान तापसी म्हणाली होती की, अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्यावर बहिष्कार टाकला जात असताना तिच्या चित्रपटावरही बहिष्कार टाकला पाहिजे. मुकेश यावरून तिच्यावर चांगलेच चिडले आहेत.

मुकेश म्हणाले की, 'बॉलीवूडच्या आजच्या स्थितीला बॉलिवूडच जबाबदार आहे. आपली नाव का बुडत आहे. याचा विचार बॉलिवूडला करावा लागेल.' मुकेश म्हणतात, “आमच्याकडे जे स्टार्स आहेत ते अभिनेते आहेत, त्यांच्यात खूप आत्मविश्वास आहे. किंवा ते आंधळेपणाने मांजर येताना पाहू शकत नाहीत. स्वत:ला स्टार समजणाऱ्या अभिनेत्रीने अतिशय मूर्खपणाचे आणि बालिश विधान करताना आपण पाहिलं . असं म्हटलं जातं का? तेही अशा वेळी जिथे विटा, दगड, माती आधीपासूनच फेकली जात आहेत. अशा वेळी असे वक्तव्य केले जात आहे जे निषेधार्ह आहे.

मुकेश पुढे म्हणाले, 'एका अभिनेत्यानेही असे वक्तव्य केलेहोते, जो जनतेशी लढायला तयार आहे. अहो ही जनता जनार्दन आहे. तुमचे चित्रपट हिट आहेत तसेच फ्लॉपही आहेत.' असं म्हणत त्यांनी अर्जुन कपूरवर देखील निशाणा साधला आहे.

IPL_Entry_Point

विभाग