Mufasa The Lion King: शाहरुख खानची निवड योग्यच! वाचा कसा आहे ‘मुफासा द लायन किंग’ सिनेमा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mufasa The Lion King: शाहरुख खानची निवड योग्यच! वाचा कसा आहे ‘मुफासा द लायन किंग’ सिनेमा

Mufasa The Lion King: शाहरुख खानची निवड योग्यच! वाचा कसा आहे ‘मुफासा द लायन किंग’ सिनेमा

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 20, 2024 05:16 PM IST

Mufasa The Lion King: नुकताच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची दोन्ही मुले आर्यन व अबरामने आवज दिलेला अॅनिमेटेड सिनेमा ‘मुफासा द लायन किंग’ प्रदर्शित झाला आहे. चला जाणून घेऊया सिनेमा कसा आहे…

Mufasa The Lion King (Disney via AP)
Mufasa The Lion King (Disney via AP) (AP)

गेल्या काही दिवसांपासून 'मुफासा द लायन किंग' या अॅनिमेटेड सिनेमाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांची दोन्ही मुले अबराम व आर्यन यांनी आवाज दिला आहे. एकंदरीत हा चित्रपट पाहिल्यानंतर या सिनेमासाठी खान कुटुंबीयांची निवड ही योग्य ठरल्याचे तुम्हाला जाणवेल. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या लायन किंग सिनेमाचा हा प्रिकवल आहे. 'मुफासा द लायन किंग' या चित्रपटात एक हरवलेला छावा आपल्या आई-वडिलांच्या शोधात असतो. पण त्यांच्या शोधात असताना तो एका दूरच्या राज्यावर राज्य करु लागतो.

शाहरुखची निवड योग्य

१९९४ मध्ये अॅनिमेटेड लायन किंग या चित्रपटात दिवंगत जेम्स अर्ल जोन्स यांनी मुफाला आवाज दिला होता. त्यामुळे मुफासा द लायन किंग सिनेमाच्या सुरुवातीलाच त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. चित्रपटाची मूळ कथा पाहाता या व्यक्तिरेखेच्या पंजामध्ये सहजपणे कोणी भारतीय अभिनेता उतरू शकत असेल तर तो म्हणजे केवळ शाहरुख खान. मुफासाप्रमाणेच या अभिनेत्यानेही आपल्या आई-वडिलांना अगदी लहान वयातच गमावले आणि कुठेतरी तो त्यांच्या शोधात असल्याचे दिसून येते.

काय आहे चित्रपटाची कथा

मुफासा द लायन किंग या चित्रपटाची कथा सिंहि‍णीच्या छाव्या भोवती फिरते. हा छावा अचानक पूर आल्यामुळे आई-वडिलांपासून वेगळा झाला आहे. या छावाचे नाव मुफासा आहे. मुफासा आपल्या आईृ आणि वडिलांच्या शोधात असतो. या प्रवासात तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो. पण तेथील सिंह त्याला नाकारतात. एक राज्य असे असते जिथे एक सिंहिण आणि तिचा छावा मुफासाला आपलेसे करतात. या सिंहणीचे नाव राका असते. राका मुफाला जवळ घेते आणि मिठी मारते. तिला त्याच्यामध्ये एक राजकुमार दिसतो. मुफासा नुकताच बनलेला भाऊ ताका प्रमाणे सर्व गोष्टींना घाबरुन आणि जबाबदारी घेण्यास नकार देतो. तरीही, त्याचा प्रवास जसजसा पुढे सरकतो तसतसा मुफासा त्याच्या स्वप्नातील राज्याचा राजा बनवतो. राजा बनणे हा मुफाचा निर्णय नसतो. पण नियतीने त्याला राजा बनवले आहे.

शाहरुखच्या मुलांनी देखील दिला आवाज

शाहरुखची मुले आर्यन खान आणि अबराम खान देखील या चित्रपटाचे भाग आहेत. आर्यनने सिम्बा या पाहुण्या पात्राला आवाज दिला आहे, तर अबरामने मुफासाच्या लहानपणीच्या पात्राला आवाज दिला आहे. मुफासाच्या आई-वडिलांपासून ते सिम्बाची मुलगी कियारापर्यंत चार पिढ्यांची कथाही या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हरवलेल्यांचा नेहमी इतरांवर कसा प्रभाव असतो याबद्दल शाहरुख अनेकदा बोलताना दिसत आहे. तो त्याच्या जवळच्या लोकांना अनेकदा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी 'मैं हू ना' असे म्हणत धीर देताना दिसतो.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?

चित्रपटाच्या शेवटी मुफासा सर्वांना एकत्र आणतो. त्याला एक माकड भेटते. या माकडाला त्याच्या टोळीने हकलले आहे. जंगलातले सर्व प्राणी एकत्र येऊन मुफासाच्या नेतृत्वाखाली पांढऱ्या सिंहाना चांगला धडा शिकवतात. हे पांढरे सिंह ज्या गोष्टी त्यांच्या नाहीत त्यावरही हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटाच्या शेवटी राजकुमार म्हणून जन्माला आलेला मुफासाचा भाऊ ताकाला त्याने केलेल्या कृत्यामुळे हद्दपार केले जाते. तर मुफासा राजा होण्यासाठी संयम, नियती आणि कृती या तिन्ही गोष्टींच्यी गरज असल्याचे दाखवून दिले आहे.

Whats_app_banner