Mufasa The Lion King : 'मुफासा द लायन किंग' आता ओटीटीवर बघता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mufasa The Lion King : 'मुफासा द लायन किंग' आता ओटीटीवर बघता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या

Mufasa The Lion King : 'मुफासा द लायन किंग' आता ओटीटीवर बघता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या

Jan 06, 2025 11:50 AM IST

Mufasa The Lion King On OTT : 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट' २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'द लायन किंग' या क्लासिक सिनेमाचा सिक्वेल आहे.

Mufasa The Lion King (Disney via AP)
Mufasa The Lion King (Disney via AP) (AP)

Mufasa The Lion King On OTT : बॉलिवूड किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान याने आपल्या मुलांसह आवाज दिलेला, डिस्नेचा ॲनिमेटेड चित्रपट 'मुफासा: द लायन किंग' २० डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या मोठ्या वादळातही या चित्रपटाची कमाई सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. दरम्यान, आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची सगळीकडे चर्चा होत आहे. हा गाजलेला चित्रपट केव्हा आणि कुठे रिलीज होईल, ते जाणून घेऊया...  

मुफासा: द लायन किंग’ या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये तब्बल १३६.५० कोटी रुपये जमा केले आहेत. इतकंच नाही तर हा चित्रपट जगभरात चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या १६ दिवसांत जगभरात ३२५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, या चित्रपटाचे परदेशातील संकलन २०५० कोटी रुपये आहे आणि भारतातील एकूण संकलन १५५.२५ कोटी रुपये आहे. २०२४मधील सर्वाधिक कमाई करणारा हा ९वा चित्रपट ठरला आहे. आता सगळ्यांना हा चित्रपट घर बसल्या ओटीटीवर बघण्याची उत्सुकता लागली आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

कधी होऊ शकतो रिलीज?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या थिएटर आणि डिजिटल रिलीजमध्ये अंदाजे १०० दिवसांचा अवधी आहे. त्यानुसार, हा चित्रपट मार्च किंवा एप्रिल २०२५मध्ये ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. यापूर्वी, डिस्नेचा 'द लिटिल मरमेड' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर १०३ दिवसांनी ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता.

AR Rahman : असे काय घडले की एआर रहमानला हिंदू धर्म बदलून इस्लाम स्वीकारावा लागला?

डिस्ने कडून त्यांचे चित्रपट सामान्यत: थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी डिजिटल स्वरूपात रिलीजसाठी उपलब्ध केले जातात. आता 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 

शाहरुख खानने दिला आवाज

'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट' २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'द लायन किंग' या क्लासिक सिनेमाचा सिक्वेल आहे. त्याच्या हिंदी व्हर्जनमध्ये शाहरुख खान, अबराम खान, आर्यन खान, श्रेयस तळपदे आणि संजय मिश्रा यांनी वेगवेगळ्या पात्रांना आवाज दिला आहे. ‘द लायन किंग’च्या पहिल्या भागात मुफासा आणि त्याचा भाऊ स्कार यांच्यातील वैर पाहायला मिळाले. पण, यावेळी मुफासा त्याच्या बालपणात आलेल्या पुरामुळे त्याच्या कुटुंबापासून कसा विभक्त होतो आणि सिंहांच्या दुसऱ्या कळपापर्यंत पोहोचतो, जिथे तो त्याच्या भावाला भेटतो. मग, घुसखोर त्यांच्या कुटुंबाला कसे मारतात आणि हे त्यांच्या जीवावर बेतते, हे दाखवण्यात आले आहे.

Whats_app_banner