मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 04, 2024 03:52 PM IST

सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे मृणाल ठाकूर. तिची लोकप्रियता सातासमुद्रा पार पाहायला मिळते. पण महागडे आणि डिझायनर कपडे खरेदी करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया ऐकून सर्वजण चकीत झाले आहे.

मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया
मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया (Instagram/@mrunalthakur)

सध्याची अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे मृणाल ठाकूर. तिने ‘सिता रामम’, ‘हाय अन्ना’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्याच्या घडीला ती अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे. ती सुपरस्टार अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसते. नुकताच एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्याविषयी खुलासा केला आहे. तिने कपड्यांवर वायफळ खर्च करत नसल्याचे सांगितले.

मृणालने नुकताच 'गलाटा प्लस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये डियाझनर आणि महागड्या कपड्यांवर पैसे खर्च करत नसल्याचे तिने सांगितले. “डिझायनर कपड्यांवर मला जास्त पैसे खर्च करायला आवडत नाहीत. कारण जेव्हा ट्रेंड जातो तेव्हा ते पुन्हा वापरता येत नाहीत. ते कपडे तुम्हा परत घालणार नाहीत" असे मृणाल म्हणाली.
वाचा; पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला

मृणालने सांगितले तिच्या कपड्यांविषयी

पुढे या मुलाखतीमध्ये मृणालला तिने घातलेल्या कपड्यांविषयी विचारण्यात आले. “आता घातलेले हे माझे कपडे नाहीत. मी आता घातलेल्या या कपड्यांचा वापर फक्त प्रमोशन्ससाठी करते. या टॉपसाठी मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च केले आहेत आणि तेही मला जास्त वाटत आहेत. या इतक्या महागातल्या गोष्टी जरी असल्या तरी तुम्ही त्या पुन्हा पुन्हा वापरू शकत नाही. तुमच्याकडे नेहमीच क्लासिक कलेक्शन असायवा हवे. पण कोणता तरी ब्रँड आहे म्हणून कपडे घ्यायचे आणि आपले पैसे फुकट घालवणाऱ्यातील मी नाही. यापेक्षा त्या पैशांचा वापर मी खाण्यात, घर घेण्यात, एखादे रोपटे लावण्यात किंवा जमीन घेऊन त्यावर शेती करण्यात खर्च करेन” असे मृणाल म्हणाली.
वाचा: बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेमध्ये नवे रंजक वळण

सतत बॅग, जिन्स आणि टॉप मिसमॅच करत असते

मृणालला तिने अनेकदा डिझायनर कपडे घातल्याची आठवण या मुलाखतीमध्ये करुन देण्यात आली. याविषयी ती म्हणाली, “मी सर्वांना चीट करते. जर माझ्या कपाटात हजार गोष्टी असतील तर त्यातल्या पाच गोष्टी या स्टेटमेंट पीस असतात. मी टॉप, जीन्स घालते. त्यावर शूज, बॅग घेते. त्यामुळे यासारख्या स्टेटमेंट गोष्टी सतत बदलत राहते. नेहमी असे करत राहिल्याने मी नेहमी वेगळी आणि छान दिसते. महागडे कपडे खरेदी करण्याची मला गरज वाटत नाही.”
वाचा: ‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार

मृणालच्या कामाविषयी

मृणाल ठाकूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिने सिता रामम, हाय नाना, जर्सी, सुपर ३० या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती लस्ट स्टोरी २ या वेब चित्रपटात देखील दिसली होती. आता लवकरच तिचा 'फॅमिली सुपरस्टार' हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

IPL_Entry_Point