आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मृणाल ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. दरम्यान, मृणालने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क सांग सांग भोलानाथ हे गाणे गाताना दिसत आहे.
मृणालने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवरील आस्क मी एनीथिंगच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण यामध्ये तिला एका चाहत्याने थेट तू मराठी आहेस का? असाच प्रश्न विचारला. त्यावर मृणालनेही अगदी हटके अंदाजात उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. तिच्या या उत्तराची सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
मृणालने तिच्या या चाहत्याला अगदी हटके अंदाजात उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. मृणालला जेव्हा तिच्या चाहत्याने तू मराठी आहेस का? असा प्रश्न विचारला, त्यावर मृणालने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या मैत्रीणींना आपण महाराष्ट्रीयन आहोत ना, असं विचारते. त्यावर तिच्या मैत्रीणी देखील म्हणतात की, होय, आम्ही कट्टर महाराष्ट्रीयन आहोत..जय महाराष्ट्र...पुन्हा मृणाल म्हणते की, पण हे त्यांना कसं कळेल? एखादं मराठी गाणं गा.. त्यानंतर मृणालसह तिच्या मैत्रीणी सांग सांग भोलानाथ हे गाणं गातात.
वाचा: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी
मृणालने लव सनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने सुपर 30, बाटला हाऊस, जर्सी आणि धमाका या चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता मृणालचा सन ऑफ सरदार २ आणि विश्वंबरम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.