बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय हिट चित्रपटांच्या यादीमधील एक सिनेमा म्हणून 'मिस्टर इंडिया' ओळखला जातो. अनिल कपुरचा 'मिस्टर इंडिया' हा सिनेमा पाहिला नसेल असे क्वचितच प्रेक्षक असतील. या चित्रपटात एका सिनमध्ये 'मि.इंडिया' हनुमानाची सोन्याची मूर्ती घेऊन खलनायकांना बदडून काढतो. तेजसाहेब या पात्राला कंकर वाला जेवण जबरदस्ती खायला लावतो. यावेळी तेजसाहेबांचा झालेला केविलवाणा चेहरा पाहून अगदी पोट धरून हसायला येते. या तेजसाहेबांचा रोल करणारे कलाकार होते अभिनेते अजित वाच्छानी. त्यांचे मराठी इंडस्ट्रीशी एकदम जवळचे नाते आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय?
तुम्ही जर ८०-९० च्या सिनेमाचे फॅन असाल खासकरून सुरज बडजात्या यांचे चित्रपट पहिले असतील तर अजित वाच्छानी हा तुमच्यासाठी नक्कीच ओळखीचा चेहरा असेल. अजित वाच्छानी हे मूळचे सिंधी असले तरी गुजराती रंगभूमीवर त्यांचं मोठं नाव होत. शिवाय हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार होते. ९०च्या दशकातील हिंदी मालिका त्यांच्याशिवाय पूर्णच होत नसत लक्ष्या-अशोक सराफ-सचिन या त्रिकुटाच्या 'एकापेक्षा एक' मध्ये देखील झळकले होते.
पण फार कमी जणांना माहित असेल कि हिंदी गुजरातीतला हा मोठा स्टार चक्क महाराष्ट्राचा जावई होता. होय अजित वाच्छानी हे महाराष्ट्र भूषण शाहीर साबळे यांचे जावई होते. अजित वाच्छानी यांनी शाहीर साबळे यांची मुलगी चारुलता साबळे यांच्याशी लग्न केलं होते. चारुशीला साबळे या देखील मराठी सिनेसृष्टी रंगभूमीवरीलला लोकप्रय अभिनेत्रीं आहेत.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
चारुलता यांनी अनेक हिंदी नाटकांमध्ये देखील काम केले आहे. या दोघांची भेट एक नाटकाचा प्रयोगादरम्यानच झाली होती. एका कॉमन मित्राद्वारे यांच्यात मैत्री झाली. अजित यांना चारुलता फार आवडल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्याकडे लग्नाची मागणी घातली होती. चारुलता साबळे यांनी अजित वाच्छानी यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र २५ ऑगस्ट २००३ रोजी अजित वाच्छानी यांचा हृद्यविकाराने मृत्यू झाला. त्यांची एक मुलगी त्रिशाला ही एअरहोस्टेस आहे व दुसरी योहाना गुजराती रंगभूमीवरील अभिनेत्री आहे.
संबंधित बातम्या