Moye Moye Video Viral: मित्राचे लग्न लागताच सगळे म्हणाले ‘मोये मोये’; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले!-moye moye gone wrong friends teasing groom with sad meme netizens were outraged after seeing the video ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Moye Moye Video Viral: मित्राचे लग्न लागताच सगळे म्हणाले ‘मोये मोये’; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले!

Moye Moye Video Viral: मित्राचे लग्न लागताच सगळे म्हणाले ‘मोये मोये’; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले!

Jan 03, 2024 03:06 PM IST

Moye Moye Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातील आहे. चला तर, बघूया नेमकं काय घडलं आणि नेटकरी का चिडले?

Moye Moye Video Viral
Moye Moye Video Viral

Moye Moye Viral Video: सध्या सोशल मीडियावर ‘मोये मोये’ या गाण्याने चांगलाच कल्ला केला आहे. या गाण्यावरचे अनेक व्हिडीओ आणि मिम्स तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडिया सुरू करताच ‘मोये मोये’चा सूर लगेच ऐकू येऊ लागतो. मात्र, आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच नेत्कारी भडकले आहे. इतकंच नाही तर, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर जोरदार टीका देखील केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातील आहे. चला तर, बघूया नेमकं काय घडलं आणि नेटकरी का चिडले?

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणाचे लग्न लागताना दिसत आहे. वधू आणि वर एकमेकांना हार घालताच जवळच उभे असलेले त्याचे मित्र ‘मोये मोये’ हे गाणे जोरात ओरडू लागतात. त्यांच्या या ‘मोये मोये’ने वधू मात्र चांगलीच वैतागली. एक जळजळीत कटाक्ष टाकत तिने आपला राग देखील व्यक्त केला. मात्र, तरीही हे मित्र ‘मोये मोये’ ओरडतच राहिले. एखाद्या वाईट घटनेला किंवा मिमच्या पार्श्वभूमीवर वाजणारे हे गाणे, लग्नासारख्या आनंदाच्या ठिकाणी ‘मोये मोये’ म्हटल्याने नेटकरी देखील संतापले आहेत.

Shreyas Talpade: ‘वैद्यकीयदृष्ट्या मी मृतच होतो, पण...’; श्रेयस तळपदेने सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं!

सर्बियन भाषेतील ‘मोये मोये’ हे गाणे एक दुःखाची भावना दर्शवणारे गाणे आहे. यातून मनातील वेदना, राग आणि दुःख व्यक्त केलं गेलं आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर अगदी काहीही व्हिडीओ शेअर करून, त्यात ‘मोये मोये’चा वापर केला जात आहे. आता नेटकरी या व्हिडीओवर तुफान टीका करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहीले की, ‘लग्नासारखी आनंदाची गोष्ट आयुष्यात एकदाच घडते. मात्र, या लोकांनी असं कृत्य करून, सगळ्या गोष्टींना उद्ध्वस्त केलं आहे. त्या नववधूला मुलाच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांचं कारण ठरवून त्यांनी तिचा अपमान केला आहे.’

आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘बिचारी मुलगी... तिचे हावभाव बघूनच कळत आहे की, तिला किती वाईट वाटत आहे. हे मित्र आपल्या एका मित्राच्या लग्नाच्या निर्णयावर आनंदी होऊ शकत नाहीत का?’. ‘हे असे मित्र आहेत, ज्यांना कधीच लग्नाला बोलावू नये. तो त्यांचा दिवस होता. मात्र, केवळ लोकांच लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी असं केलं. त्या मुलीच्या जागी स्वतःला ठेवून जरासा विचार करा, की तिला कसं वाटलं असेल.’

विभाग