Movies in August: ‘उलझ’ ते ‘औरों में कहा दम था’; ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Movies in August: ‘उलझ’ ते ‘औरों में कहा दम था’; ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!

Movies in August: ‘उलझ’ ते ‘औरों में कहा दम था’; ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!

Jul 31, 2024 09:35 AM IST

Movies Releasing in August:ऑगस्टच्या पहिल्या१५ दिवसांतच एकापेक्षा एक हिट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात अजय देवगणचा'और में कहां दम था' ते श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट'स्त्री २'चा समावेश आहे.

ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!
ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!

Movies Releasing in August: दर आठवड्याला अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतात. २७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'कल्की २८९८ एडी'ची जादू जुलैमध्येही पाहायला मिळाली आहे. त्याचवेळी, या महिन्यात बॉक्स ऑफिसवर 'बॅड न्यूज' आणि हॉलिवूडच्या 'डेडपूल अँड वूल्व्हरिन'चे यश पाहायला मिळाले आहे. मनोरंजनाने भरलेला हा प्रवाह असाच या महिन्यातही सुरू राहणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांतच एकापेक्षा एक हिट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात अजय देवगणचा 'और में कहां दम था' ते श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्त्री २'चा समावेश आहे. 

उलझ

'उलझ' हा जान्हवी कपूरचा चित्रपट आहे. या चित्रपटात ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून, यात जान्हवी कपूर आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

'औरों में कहाँ दम था 

अजय देवगण आणि तब्बू यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत आणि आता ते त्यांचा १०वा चित्रपट 'औरों में कहाँ दम था'मध्ये पुन्हा एकदा सोबत दिसणार आहेत. हा चित्रपट दोन लोकांची प्रेमकथा आहे, जे काही कारणास्तव अनेक वर्षांपूर्वी वेगळे झाले. हा चित्रपट २ ऑगस्टला रिलीज होणार आहे. यात अजय देवगण, तब्बू, शंतनू माहेश्वरी जिमी शेरगिल हे कलाकार झळकणार आहेत.

वेदा

२०२३मध्ये जॉन अब्राहमचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. येत्या १५ ऑगस्टला तो 'वेदा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक ॲक्शन-पॅक्ड चित्रपट असेल, ज्यामध्ये त्याची भूमिका एका सैनिकाची असेल. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार असून, यात जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ झळकणार आहेत.

Viral Video: विमानतळावर सेल्फी घेत असलेल्या चाहत्याला चिरंजीवीनं ढकललं! व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप

स्त्री २

‘स्त्री २’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. यावेळी श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या चित्रपटात मानकाप्याची दहशत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. यात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, वरुण धवन, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

खेल खेल में 

याच वर्षी अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तो या वर्षातील त्याचा दुसरा चित्रपट 'खेल खेल में' घेऊन येत आहे. हा कॉमेडी जॉनरचा चित्रपट असेल. येत्या १५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमार, तापसी पन्नू, फरदीन खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

डबल आयस्मार्ट

सोशल मीडियावर डबल आयस्मार्टची जोरदार चर्चा सुरू आहे. 'केजीएफ'नंतर संजय दत्त यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. यात संजय दत्त, राम पोथीनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

तंगलान

चियान विक्रम हा साऊथचा मोठा अभिनेता मानला जातो. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'अपरिचित' आणि 'पोनियिन सेल्वन'सह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता त्याचा ‘तंगलान’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होत असून, यात चियान विक्रम, पार्वती थिरोवथू, मालविका मोहनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बिन्नी अँड फॅमिली 

'बिन्नी अँड फॅमिली' हा वरुण धवनची भाची अंजिनीचा डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच एकता कपूरने शेअर केले आहे. यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी अंजनीला तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट ३० ऑगस्ट रिलीज होत असून, यात अंजिनी धवन, पंकज कपूर, हिमानी शिवपुरी, राजेश कुमार हे कलाकार झळकणार आहेत.

Whats_app_banner