बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका

बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 04, 2024 07:43 PM IST

संजय दत्त मुख्य भूमिकेत असणारे अनेक सिनेमे ९०च्या दशकात प्रदर्शित झाले होते. त्यामधील एक सिनेमा गँगस्टर छोटा राजनच्या आयुष्यावर आधारित होता.

Sanjay Dutt
Sanjay Dutt

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच नातं काही कोणाशी लपून राहीलेलं नाही. ८० च्या दशकात दाऊद इब्राहिमच्या दुबईच्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी असो, अभिनेत्रींचे अंडरवर्ल्ड डॉनसोबत प्रेमसंबंध असो किंवा खंडणी आणि हिंदी चित्रपटांमध्ये गुंतवलेला कळा पैसा मात्र या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे डी गँग. होय बॉलिवूडच्या सगळ्या काळ्या कामांमध्ये डी गँगचेच वर्चस्व होतो. दाऊदचे विरोधी म्हणजेच छोटा राजन , गवळी यासारख्या लोकांनी बॉलिवूडला बिझनेस म्हणून पाहिलं होतं असं फारसं ऐकण्यात आलं नाही. मात्र हे तितकं खरं नाही. पण एक सिनेमा असा होता जो छोटा राजनच्या जीवनावर आधारित होता.

काय आहे सिनेमाचे नाव?

अनेकांना प्रश्न पडला असेल की छोटा राजनच्या जीवनावर कधी बॉलिवूडमध्ये सिनेमा आला होता का? पण हे खरं आहे. १९९९ मध्ये रिलीज झालेला 'वास्तव' हा सिनेमा तुम्हाला आठवतच असेल. पण फार कमी जणांना माहित असेल आहे की 'वास्तव' हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या आयुष्यावर आधारित असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटामध्ये संजय दत्तने साकारलेली रघुनाथ नामदेव शिवलकर ही भूमिका राजन निकाळजे म्हणजेच छोटा राजनच्या आयुष्यातील घडलेल्या घटनांवर बेतलेली होती.

चित्रपटाची निर्मिती कोणी केली होती?

विशेष म्हणजे 'वास्तव' या चित्रपटाची निर्मिती ही दुसरा तिसरा कोणी नाही तर राजन यांचा लहान भाऊ दीपक निकाळजे यांनी केली होती. त्यावेळी या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये दीपक निकाळजे यांच्या उपस्थितीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. राजन यांच्या आयुष्यातील घटनांवर अभ्यास करण्यासाठी दिगदर्शक महेश मांजरेकर यांनी दीपक निकाळजे याची मदत घेतल्याचे सांगितले जाते.
वाचा: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक

दीपक निकाळजे अजूनही छोटा राजनच्या गड समजल्या जाणाऱ्या चेंबूरमध्येच राहातात. ते बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले होते तेव्हापासून राजन विरोधातील खटल्यांची सुनावणी कोर्टात सुरू आहे.

Whats_app_banner