Viral Video: न्यू इयर पार्टीत कॅमेरासमोर धपकन पडली मौनी रॉय! व्हिडिओ पाहताच लोकांनी उडवली खिल्ली
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: न्यू इयर पार्टीत कॅमेरासमोर धपकन पडली मौनी रॉय! व्हिडिओ पाहताच लोकांनी उडवली खिल्ली

Viral Video: न्यू इयर पार्टीत कॅमेरासमोर धपकन पडली मौनी रॉय! व्हिडिओ पाहताच लोकांनी उडवली खिल्ली

Jan 02, 2025 08:58 AM IST

Mouni Roy Falls Down: नवीन वर्षाच्या निमित्ताने अभिनेत्री मौनी रॉय पती सूरज नांबियार आणि अभिनेत्री दिशा पाटणीसोबत पार्टी एन्जॉय करण्यासाठी पोहोचली होती. यावेळी ती कॅमेरासमोर पडली.

Mouni Roy Falls Down
Mouni Roy Falls Down

Mouni Roy Falls Down: बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतचे सेलिब्रिटी नवीन वर्ष २०२५चं स्वागत करून या निमित्ताने आयोजित पार्टीचा आनंद घेत आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने अभिनेत्री मौनी रॉय देखील पती सूरज नांबियार आणि अभिनेत्री दिशा पाटणीसोबत पार्टी एन्जॉय करण्यासाठी पोहोचली होती. मात्र, पार्टीवरून परतत असताना मौनी रॉयसोबत छोटासा अपघात झाला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मौनी तिचा पती आणि तिच्या मित्रांसोबत पार्टीतून परतताना दिसली आहे. त्यानंतर अभिनेत्री तिच्या हिल्समुळे कॅमेरासमोर जोरात पडली. या अभिनेत्रीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अभिनेत्री मौनी रॉय पती सूरज नांबियार आणि जवळची मैत्रीण बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीसोबत पार्टीत पोहोचली होती. त्यांच्यासोबत इतर मित्रही उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मौनी रॉय तिचा पती सूरज आणि मित्र दिशा पटानीसोबत पार्टीमधून बाहेर पडत आहे. ती कारच्या दिशेने जाताच तिचा तोल बिघडतो आणि अभिनेत्री जोरात खाली पडते.

Mouni Roy: कायम हॉट फोटो शेअर करणाऱ्या मौनी रॉयचा पारंपरिक लूक पाहिलात का?

पती सूरजने सावरलं!

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मौनी रॉयने काळ्या रंगाची बॅकलेस शॉर्ट मिडी परिधान केली आहे. यासोबतच अभिनेत्रीने हाय हिल्स घातल्या आहे. कॅमेरासमोर तिचा तोल जाताच अभिनेत्रीचा पती सूरज आणि मैत्रीण दिशा तिला पटकन सावरतात आणि उचलतात. यानंतर दोघेही अभिनेत्रीला कारकडे घेऊन जातात. मात्र, यानंतर पापाराझींनी अभिनेत्रीला घेरले आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. तर, मौनी रॉय आपला चेहरा लपवून सरळ कारमध्ये बसते.

नेटकरी काय म्हणाले?

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी कमेंट केली की, कदाचित पार्टीत मद्यपान केल्यामुळे असे झाले असावे. काही युजर्सचे म्हणणे आहे की अभिनेत्रीने हाय हिल्स घातली असावी, ज्यामुळे तिचा अचानक तोल गेला आणि ती पडली.

मौनी रॉय लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची 'ब्लॅकआउट' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत विक्रांत मेस्सीही मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय अभिनेत्रीने जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांच्या 'वेदा' चित्रपटात खास भूमिका साकारली होती. लवकरच चाहत्यांना मौनी रॉय 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय 'मलंग २' चित्रपटातही तिची भूमिका असणार आहे.

Whats_app_banner