मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Berlin season 1: ‘मनी हाईस्ट’चा दुसरा मास्टर माइंड; काय आहे ‘बर्लिन सीझन १‘ची कहाणी?

Berlin season 1: ‘मनी हाईस्ट’चा दुसरा मास्टर माइंड; काय आहे ‘बर्लिन सीझन १‘ची कहाणी?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 10, 2024 08:03 PM IST

Money Heist Spin off Berlin: नेटफ्लिक्सचा लोकप्रिय स्पॅनिश शो ‘मनी हाईस्ट’चा 'बर्लिन' स्पिनऑफ २९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Berlin season 1
Berlin season 1

Money Heist Spin off Berlin: एका मोठ्या चोरीचा हटके प्लान आणि चोरांची नावं प्रसिद्ध शहरांवरून ठेवलेली, या सीरिजने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. ‘मनी हाईस्ट’ असं या प्रसिद्ध स्पॅनिश सीरिजचं नाव आहे. या सीरिजने नेटफ्लिक्सवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सीरिजमध्ये ‘बर्लिन’ नावाचं एक पात्र होतं. या पात्राने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. या पात्राला मिळालेली प्रसिद्धी बघता यावर एक वेगळी सीरिज तयार करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला होता. अखेर याचा पहिला सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

नेटफ्लिक्सचा लोकप्रिय स्पॅनिश शो ‘मनी हाईस्ट’चा 'बर्लिन' स्पिनऑफ २९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीरिजमधून आंद्रेस डी फोनोलोसा उर्फ बर्लिनचे जुने आयुष्य दाखवण्यात आले आहे. या सीरिजमध्ये ‘बर्लिन’ हे पात्र अभिनेता पेड्रो अलोन्सोने साकारले आहे. 'मनी हाईस्ट'च्या पहिल्याच सीझनमध्ये ‘बर्लिन’ हे पात्र मारले गेले होते. पण त्या व्यक्तिरेखेची क्रेझ पाहून या व्यक्तिरेखेला शोच्या दुसऱ्या सीझनमध्येही परत आणण्यात आले होते. यानंतर लोकांना हे पात्र इतकं आवडलं की, आता याच नावाने एक सीरिज रिलीज करण्यात आली आहे.

Janhvi Kapoor Affair: शिखरसोबत सारा तेंडुलकरची पार्टी; रागावलेल्या जान्हवी कपूरने केले असे काही की...

कोण आहे बर्लिन?

‘बर्लिन सीझन १’मध्ये 'मनी हाईस्ट'मधील प्रोफेसरच्या मोठ्या भावाची म्हणजेच ‘बर्लिन’ची कथा दाखवण्यात आली आहे. ‘बर्लिन’ ही सीरिज ‘मनी हाईस्ट’चा प्रीक्वल आहे. अँड्रेस उर्फ बर्लिनला चाहते ‘अँटी हिरो’च्या प्रतिमेत पाहतात. तो केवळ महत्त्वाकांक्षीच नाही, तर स्त्रियांबद्दलचा त्याचा दृष्टिकोनही वेगळा आहे. एक निर्दयी आणि अतिशय धोकादायक असा बर्लिन एक कुख्यात चोर देखील आहे. बर्लिन एका सर्वात मोठ्या चोरीची योजना आखतो आणि आपल्या टीमच्या मदतीने ती पूर्ण देखील करतो.

काय आहे कथानक?

या सीरिजमध्ये बर्लिनने पॅरिसच्या एका ठिकाणाहून ४४ दशलक्ष युरो चोरण्याची एका योजना आखली आहे. या चोरीच्या प्लॅनमध्ये बर्लिनसोबत डॅमियन देखील आहे. डॅमियन हा या चोरीचा मास्टरमाइंड आहे. बर्लिन या कामात त्याला मदत करतो. बर्लिनच्या ग्रुपमध्ये काही हॅकर्स देखील आहेत, जे तांत्रिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, बर्लिन एका मुलीच्या प्रेमात पडतो. या आधी बर्लिनचे तीन विवाह अयशस्वी ठरले आहेत. ‘बर्लिन’ या सीरिजची कथा एका चोरीवर आधारित असली तरी, या टीममधील प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करते. बर्लिनच्या आयुष्यातील समस्या अधिक महत्त्वाच्या असल्यासारख्या वाटतात. सध्या या सीरिजला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

WhatsApp channel

विभाग