मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mohan Agashe : सध्याचं राजकारण त्रासदायक; मोहन आगाशेंनी व्यक्त केली चिंता

Mohan Agashe : सध्याचं राजकारण त्रासदायक; मोहन आगाशेंनी व्यक्त केली चिंता

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 11, 2024 03:33 PM IST

Mohan Agashe On Current Politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरु आहे त्यावर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी चिंता व्यक्त करत केलेल्या व्यक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Mohan Agashe
Mohan Agashe

Mohan Agashe On Politics : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणातील अनपेक्षित घडामोडी, पक्ष फोडाफोडी हे पाहून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 'सध्याचे राजकारण मला खूप त्रास देतय, पुढील पिढीची काळजी वाटत' असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

डॉ. मोहन आगाशे यांनी 'तारांगण' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 'सध्याच्या राजकारणामुळे अस्वस्थ वाटत आहे. पुढील पिढीसाठी आपण काय सोडून जात आहोत, याकडे कोणी लक्षात देत नाही. कदाचित या वाईटातून चांगलेही घडू शकते. जी अस्वस्थता मी अनुभवत आहे, तशी इतरही अनुभवत असतील. त्यामुळे पुढील पिढी यातून आणखी काही चांगले करेल असा आशेचा किरण आहे' असे मतही डॉ. आगाशे यांनी व्यक्त केले.
वाचा: १८ वर्षाची विद्यार्थीनी आणि ५२ वर्षाच्या शिक्षकाचा इंटिमेट सीन, 'मिलर्स गर्ल' सिनेमावर टीका

पुढे मोहन आगाशे यांनी राजकारणावर परखड मत व्यक्त करत म्हटले की, 'राजकारणाचा आता धंदा झाला आहेसगळ्याच नेत्यांकडून साफ निराशा झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारण हा धंदा झाला आहे. त्यामुळे प्रामाणिक राजकारणींना याचा त्रास होत आहे. एखाद्या व्यवसायात समाजभान विसरलेले धंदेवाईक लोक शिरली की त्या क्षेत्राचे नुकसान होते.'

डॉ. मोहन आगाशे यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा 'लोकशाही' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे आदींच्या भूमिका आहेत. घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास आणि या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडण्यात आले आहे.

WhatsApp channel