मॉडेल दिव्या पाहुजा हत्याकांडामुळे सध्या खळबळ उडाली आहे. २ जानेवारी रोजी दिल्लीतील गुरुग्राममधील सिटी प्लाइंट हॉटेलमध्ये दिव्याची हत्या झाली होती. जवळपास ११ दिवसांनंतर पोलिसांना तिचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
फतेहबाद येथील टोहाला कॅनॉलमध्ये दिव्याचा मृत्यदेह सापडला. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आता आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ज्याचे नाव प्रवेश आहे. ही व्यक्ती रोहतक येथील किलोद गावात राहाते.
वाचा: अडल्ट फिल्म स्टारचे वयाच्या २४ व्या वर्षी निधन, संशयास्पद मृत्यू
२७ वर्षीय दिव्या पाहुजाचा एका हॉटेलमध्ये खून करण्यात आला आहे. अभिजीत सिंह याने या महिलेची हत्या केली असून तो या हॉटेलचा मालकही आहे. दिव्याचा मृतदेह घेऊन बीएमडब्यू कारमधून घेऊन आरोपी फरार झाला. मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगर येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे. हॉटेलचा मालक अभिजीत सिंह याने आपल्या साथीदारांसोबत मिळून दिव्याची हत्या केली व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना १० लाख रुपये दिले. यानंतर अभिजीतच्या दोन साथीदारांनी अभिजीतच्या निळ्या रंगाच्या BMW कारच्या डीक्कीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढल्याचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी तपास करताच ही BMW कार फतेहबाद येथील टोहाला कॅनॉलजवळ दिसली होती. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचताच त्यांना या कॅनॉलमध्ये दिव्याचा मृतदेह सापडला.
एसीपी वरुण दहिया यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २ जानेवारीला अभिजीत हेमराज आणि ओमप्रकाश यांना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ दोन दिवसात मेघा नजफगढला अटक झाली.