Poonam Pandey death : अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन, वयाच्या ३२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Poonam Pandey death : अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन, वयाच्या ३२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Poonam Pandey death : अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन, वयाच्या ३२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 02, 2024 01:14 PM IST

Poonam Pandey Died: मॉडेल पूनम पांडेचे निधन झाले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Poonam Pandey Died
Poonam Pandey Died

Poonam Pandey Death News: मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. वयाच्या ३२व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आह. पूनम गेल्या काही दिवसांपासून कर्क रोगाशी झुंज देत होती. १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पूनमचे निधन झाले. तिच्या निधनाची बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे.

पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन निधनाची माहिती दिली आहे. ‘आजची सकाळ ही आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला कळवताना दु:ख होत आहे की मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे सर्वायकल कन्सरने निधन झाले आहे. आजवर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने तिच्यावर प्रेम केले’ या आशयाची पोस्ट तिच्या अकाऊंटवर करण्यात आली आहे.
वाचा: करिअरच्या सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफचे खरे नाव काय? जाणून घ्या

पूनम पांडेच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या निधनाचे सत्य मान्य केलेले नाही तर काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सोशल मीडियावर तिची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

पूनम पांडेने कानपूरमधील गृहनगर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. याच ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

वर्ल्डकप वेळी पूनम आली चर्चेत
पूनम पांडे ही अतिशय लोकप्रिय मॉडेल होती. २०११मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप फायनलच्या वेळी पूनम पांडे खरी चर्चेत आली. यावेळी तिने व्हिडीओ शेअर करत 'जर भारत वर्ल्ड कप जिंकला तर सर्वांसमोर कपडे काढेन' असे म्हटल्यामुळे रंगल्या होत्या. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले होते.

 

२०१३मध्ये पूनम पांडेने केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

त्यानंतर पूनमने २०१३मध्ये 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूनम ही विशेष करुन तिच्या न्यूड आणि बोल्ड फोटोंसाठी ओळखली जायची. तिने कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये देखील वादग्रस्त विधान आणि अश्लील वागण्यामुळे ती चर्चेत होती.

Whats_app_banner