शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल दिला. हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आला. अशातच काही दिवसांपूर्वी शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणारे अभिनेते किरण माने यांनी निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी "जब बंदूक न हुई, तब तलवार होगी, हम लड़ेंगे साथी" असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: द केरळ स्टोरी ते ज्विगेटो; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला 'हे' सिनेमे
कत्ल हुए जज़्बात की क़सम खाकर,
बुझी हुई नज़रों की कसम खाकर,
हम लड़ेंगे साथी... हम लड़ेंगे...
जब बंदूक़ न हुई, तब तलवार होगी...
जब तलवार न हुई,
...लड़ने की 'लगन' तो होगी !
लड़ने का ढंग न हुआ, लड़ने की 'ज़रूरत' तो होगी !!
हम लड़ेंगे साथी...
हम जीतेंगे,
ज़ाहिर है कि हम ही जीतेंगे
जो दूर बड़ी... और मुश्किल है,
उस मंज़िल तक हम पहुंचेंगे !
किरण मानेंनी फेसबुकवर देखील काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी "शिवबंधन आधीपासून मनाशी बांधलेलंच होतं घट्ट. आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं. ते ही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्या पिढीतल्या शिलेदारानं.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र" असे म्हटले होते.