Namashi Chakraborty: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Namashi Chakraborty: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात

Namashi Chakraborty: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 17, 2023 02:30 PM IST

Namashi Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती लवकरच 'बॅड बॉय' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

नमाशी चक्रवर्ती
नमाशी चक्रवर्ती

सध्या अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहे. अशातच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तो लवकरच 'बॅड बॉय' या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'बॅड बॉय' या चित्रपटाच्या २ मिनिटे ४७ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नमाशी एका अतिशय हुशार अशा मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला त्या मुलीशी लग्न करायचे असेत. मात्र नमाशीकडे नोकरी नसते. त्यामुळे त्या मुलीचे वडील लग्नास नकार देतात. ट्रेलरमधील जॉनी लिव्हर यांचे डायलॉग प्रेक्षकांना आकर्षित करतात. तसेच ट्रेलरमधील इतर काही मजेशीर संवाद ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.
वाचा: ओटीटीवर धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झाला ‘वेड’; ‘या’ दिवसापासून घरबसल्या पाहता येणार

ट्रेलर प्ले करताच नमाशी ची रोमँटिक एंट्री आहे आणि जसजसा ट्रेलर पुढे जातो तसतसे आपल्याला नमाशी त्याच्या अभिनयाच्या वेगळ्या छटा पहायला मिळतात. बॅड बॉयच्या ट्रेलरमध्ये नमाशी खऱ्या अर्थाने ‘रॉकिंग बॉय’ आहे. त्याने अपेक्षेपेक्षा चांगला अभिनय केला आहे. ट्रेलर कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सच्या यांचा मेळ असलेला रोम-कॉम चित्रपट आहे.

नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन यांच्या व्यतिरिक्त 'बॅड बॉय' या चित्रपटात जॉनी लीव्हर, सास्वता चॅटर्जी, राजपाल यादव, राजेश शर्मा आणि दर्शन जरीवाला यांच्याही भूमिका आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. इनबॉक्स पिक्चर्स, बॅनरखाली अंजुम कुरेशी आणि साजिद कुरेशी निर्मित 'बॅड बॉय'. राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला आहे. बॅड बॉय २८ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार आहे

Whats_app_banner