मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, कोलकातामधील रुग्णालयात दाखल

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, कोलकातामधील रुग्णालयात दाखल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 10, 2024 03:12 PM IST

Mithun Chakraborty Hospitalised: बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नेमकं काय झालं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Mithun Chakraborty
Mithun Chakraborty

Mithun Chakraborty Hospitalised in Kolkata: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी डोके दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने कोलकतामधील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या डोकेदूखी मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला अस्वस्थ वाटत होते. तसेच छातीत आणि डोके दुखी थांबायचे नाव घेत नसल्यामुळे त्यांना तातडीने कोलकातामधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून नेमकं काय झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: पैशासाठी मुलानेच केली बेदम मारहाण; विजय सेतुपतीची आई साकारणाऱ्या अभिनेत्रीचे निधन

मिथुन चक्रवर्ती हे कोलकातामध्ये 'शास्त्री' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यानंतर आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कोलकातामधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर न्यूरो मेडिसिन तज्ज्ञ डॉ संजय भौमिक उपचार करत आहेत. मिथून चक्रवर्ती हे ७३ वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीसंबंधी तक्रारी सतत सुरु असतात. पण ते योग्य ती काळजी घेताना देखील दिसतात. आता त्यांची प्रकृती खालावल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मिथून चक्रवर्तीला पद्म भूषण पुरस्कार

मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली. “मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे” असे ते म्हणाले होते.

मिथुन चक्रवर्ती यांच्या कामाविषयी

गेल्या वर्षी मिथुन चक्रवर्ती हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही शो 'सारेगामापा'मध्ये दिसले. या शोमध्ये ते परिक्षकाच्या भूमिकेत दिसले. तसेच त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने वडिलांसाठी एक क्यूट व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने दिलेला संदेश ऐकून मिथुनदांना अश्रू अनावर झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

यापूर्वीही रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

यापूर्वी २०२२मध्ये मिथुन चक्रवर्तीचा रुग्णालयाचील फोटो व्हायरल झाला होता. तो फोटोपाहून चाहत्यांना चिंता सतावत होती. त्यानंनतर मुलगा मिमोह चक्रवर्तीने वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. किडनी स्टोन झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मिथुन यांना काय झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग