मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mithun Chakraborty Heath Update: ब्रेनस्ट्रोक नंतर कशी आहे मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत? डॉक्टरांकडून आली माहिती

Mithun Chakraborty Heath Update: ब्रेनस्ट्रोक नंतर कशी आहे मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत? डॉक्टरांकडून आली माहिती

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 12, 2024 08:34 AM IST

Mithun Chakraborty Health update: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोलकाता रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Kolkata, Feb 11 (ANI): West Bengal Bharatiya Janata Party (BJP) Chief Sukanta Majumdar meets with veteran party leader Mithun Chakraborty who is admitted to a hospital, in Kolkata on Sunday. Mithun Chakraborty has been diagnosed with an ischemic cerebrovascular accident (stroke) of the brain. (ANI Photo)
Kolkata, Feb 11 (ANI): West Bengal Bharatiya Janata Party (BJP) Chief Sukanta Majumdar meets with veteran party leader Mithun Chakraborty who is admitted to a hospital, in Kolkata on Sunday. Mithun Chakraborty has been diagnosed with an ischemic cerebrovascular accident (stroke) of the brain. (ANI Photo) (ANI)

Mithun Chakraborty Health: बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोके आणि छातीत दुखायला लागल्यामुळे मिथुन हे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती समोर आली. वैद्यकीय भाषेत या आजाराला सेरेब्रल व्हॅस्कुलर एक्सिडेंट म्हटले जाते किंवा मेंदूचा अटॅकही म्हटले जाते. आता त्यांच्या आरोग्याबाबत अपडेट डॉक्टरांनी दिले आहे.

PTIने दिलेल्या वृत्तानुसार, एका ऑफिशल अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की आता मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते स्टेबल आहेत. हळूहळू ते ठीक होत असून त्यांना जेवणात केवळ सॉफ्ट डाएट देण्यात येत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांच्या काही टेस्ट्सही करण्यात येतील. शनिवारी त्यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांचे MRI करण्यात आले तसेच काही इतर वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या होत्या.
वाचा: थिएटरमध्ये जाळ अन् धूर! पवन कल्याणच्या चाहत्यांचे अनोखे प्रेम

समोर आलेल्या MRIमधून कळाले होते की मिथुन चक्रवर्ती यांना सेरेब्रल वॅस्क्युलरएक्सीडेंट म्हणजेच ब्रेन स्ट्रोक आला होता. तपासणीनंतर त्यांना कार्डिओवॅस्क्युलर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती बरी असून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी त्यांच्या आणखी काही तपासण्या करण्यात येतील. मात्र त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

सोशल मीडियावर मिथुन यांचा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर मिथुन यांचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते बेडवर झोपलेले दिसत असून तेथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलताना दिसत आहेत. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

मिथून चक्रवर्तीला पद्म भूषण पुरस्कार

मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली. “मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे” असे ते म्हणाले होते.

मिथुन चक्रवर्ती यांच्या कामाविषयी

गेल्या वर्षी मिथुन चक्रवर्ती हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही शो 'सारेगामापा'मध्ये दिसले. या शोमध्ये ते परिक्षकाच्या भूमिकेत दिसले. तसेच त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने वडिलांसाठी एक क्यूट व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने दिलेला संदेश ऐकून मिथुनदांना अश्रू अनावर झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

यापूर्वीही रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

यापूर्वी २०२२मध्ये मिथुन चक्रवर्तीचा रुग्णालयाचील फोटो व्हायरल झाला होता. तो फोटोपाहून चाहत्यांना चिंता सतावत होती. त्यानंनतर मुलगा मिमोह चक्रवर्तीने वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. किडनी स्टोन झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मिथुन यांना काय झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही.

WhatsApp channel

विभाग