Mithun Chakraborty Health: बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोके आणि छातीत दुखायला लागल्यामुळे मिथुन हे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आता त्यांना ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला सेरेब्रल व्हॅस्कुलर एक्सिडेंट म्हटले जाते किंवा मेंदूचा अटॅकही म्हटले जाते.
मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा लक्षणांच्या आधारे तपासणी करण्यात आली. यावेळी एमआरआयही करण्यात आला. एमआयआरएमध्येच मिथुन यांना सेरेब्रल व्हॅस्क्युलर एक्सिडेंट म्हणजेच ब्रेन स्ट्रोक झाल्याचे आढळून आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या कार्डियाव्हॅस्क्युलर आणि गॅस्ट्रोच्या डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाचा: १८ वर्षाची विद्यार्थीनी आणि ५२ वर्षाच्या शिक्षकाचा इंटिमेट सीन, 'मिलर्स गर्ल' सिनेमावर टीका
मिथुन चक्रवर्ती हे कोलकातामध्ये 'शास्त्री' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कोलकातामधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर न्यूरो मेडिसिन तज्ज्ञ डॉ संजय भौमिक उपचार करत आहेत. मिथून चक्रवर्ती हे ७३ वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीसंबंधी तक्रारी सतत सुरु असतात. पण ते योग्य ती काळजी घेताना देखील दिसतात. आता त्यांची प्रकृती खालावल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली. “मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे” असे ते म्हणाले होते.
गेल्या वर्षी मिथुन चक्रवर्ती हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही शो 'सारेगामापा'मध्ये दिसले. या शोमध्ये ते परिक्षकाच्या भूमिकेत दिसले. तसेच त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने वडिलांसाठी एक क्यूट व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने दिलेला संदेश ऐकून मिथुनदांना अश्रू अनावर झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
यापूर्वी २०२२मध्ये मिथुन चक्रवर्तीचा रुग्णालयाचील फोटो व्हायरल झाला होता. तो फोटोपाहून चाहत्यांना चिंता सतावत होती. त्यानंनतर मुलगा मिमोह चक्रवर्तीने वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. किडनी स्टोन झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मिथुन यांना काय झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही.