मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  २५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

May 18, 2024 10:34 AM IST

Gurucharan SinghMissing Case:अभिनेता गुरुचरण सिंह हा तब्बल २५दिवसांनंतर त्याच्या घरी परतला असून, त्याच्या घरी परत येण्यामुळे त्याचे कुटुंब आणि चाहते खूप आनंदी झाले आहेत.

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला!
२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला!

Gurucharan SinghMissing Case:लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम'रोशन सिंह सोढी'म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह तब्बल २५ दिवसांनंतर घरी परत आला आहे. इतके दिवस बेपत्ता राहिल्यानंतर आता अखेर तो घरी परतला आहे. अभिनेत गुरचरण सिंह घरी परतल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली,ज्यामध्ये अभिनेत्याने सांगितले की, तो या धकाधकीच्या जगापासून दूर धार्मिक प्रवासाला निघाला होता. चौकशीदरम्यान गुरुचरण सिंह याने सांगितले की, तोया प्रवासादरम्यान अमृतसर,लुधियाना आणि अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये राहिले. मात्र, नानात्र त्याला वाटले की, आता आपण घरी परतावे आणि यामुळेच आता तो आपल्या घरी परतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता गुरुचरण सिंह २२ एप्रिल रोजी मुंबईला जाण्यासाठी त्यांच्या घरातून निघाला होता. परंतु, तो ना मुंबईला पोहोचला, ना त्याच्या स्वतःच्या घरी परतला. गुरुचरण सिंह याच्याबद्दल त्याचे कुटुंबीय आणि चाहते खूप चिंतेत होते.'सोढी'चा कोणताही मागमूस न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी देखील तपास सुरू केला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अनेक खुलासे केले होते,मात्र अभिनेत्याचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान, या अभिनेत्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. मात्र, आता तब्बल २५ दिवसांनी तो स्वतःहून घरी परतला आहे.

 

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पोलिसांनी अनेक खुलासे केले

पोलीस तपासात समोर आले होते की, अभिनेता लवकरच लग्न करणार होता. एवढेच नाही तर'सोढी'हा आर्थिक संकटात देखील होता आणि बेपत्ता होण्यापूर्वी त्याने एटीएममधून पैसेही काढल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यासोबतच अभिनेता दोन फोन वापरत होता आणि २५हून अधिक ईमेल अकाऊंट्सही वापरत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले होते. याशिवाय अभिनेत्याची तब्येतही गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती.

अखेर गुरचरण सिंह घरी परतला!

मात्र,आता अभिनेता गुरुचरण सिंह हा तब्बल २५दिवसांनंतर त्याच्या घरी परतला असून, त्याच्या घरी परत येण्यामुळे त्याचे कुटुंब आणि चाहते खूप आनंदी झाले आहेत. जेव्हा अभिनेता बेपत्ता झाला होता, तेव्हा चाहत्यांना भीती होती की अभिनेता सुरक्षित असेल की नाही? मात्र, आता तो सुखरूप घरी परतला आहे. तर, त्याच्या चाहत्यांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४