नुकताच मिस यूनिवर्स २०२३ ही स्पर्धा पार पडली आहे. ७२व्या या मिस यूनिवर्स स्पर्धेत निकारागुआ येथील शेन्निस पलासियोसने हा किताब जिंकला. जगभरातील सुंदर महिलांना मागे टाकत शेन्निसने 'मिस यूनिवर्स २०२३' स्पर्धेतील विजेता पदकावर स्वत:चे नाव कोरले. याच स्पर्धेत पहिल्यांदा पाकिस्तानमधील एक मॉडेल सहभागी झाली होती. तिने बिकिनी राऊंडमध्ये घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले.
मिस यूनिवर्स स्पर्धेत पाकिस्तानी मॉडेलने एरिका रॉबिनने सहभाग घेतला. पहिल्यांदाच पाकिस्तानी मॉडेल मिस यूनिवर्स स्पर्धेत सहभागी झाली आहे. स्विम सूट राऊंडमध्ये तिने बिकिनीच्या ऐवजी एक लांबलचक ड्रेस घातला होता. या ड्रेसला बुर्किनी असे म्हणतात. एरिकाने फिकट गुलाबी रंगाचा लांब असा ड्रेस घातला. ती हा ड्रेस घालून रँपवर उतरली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पण एरिकाचा आत्मविश्वास पाहून सर्वजण चकीत झाले.
वाचा: शेन्निस पलासियोसने जिंकला 'मिस यूनिवर्स'चा किताब, या प्रश्नाने जिंकला ताज
एरिका रॉबिनने पाकिस्तानच्या वतीने मिस यूनिवर्स २०२३ या स्पर्धेत सहभाग घेतला. ती पाकिस्तानमधील ख्रिश्चन कम्यूनिटीचा भाग आहे. केवळ १ टक्के ही कम्यूनिटी आहे.
मिस यूनिवर्स २०२३ या स्पर्धेच्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये थायलंड आणि ऑस्ट्रेलियामधील दोन मॉडेलने स्थान पटकावले होते. मात्र, शेन्निस पलासियोसने मिस यूनिवर्स स्पर्धेत स्वत:चे नाव कोरले. थायलंडची एन्टोनिया पोर्सिल्ट ही पहिली रनरअप ठरली. तर ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन ही सेकंड रनरअप ठरली. यावर्षी मिस यूनिवर्स स्पर्धेत भारतातील श्वेता शारदा देखील सहभागी झाली होती. चंदीगढमधील श्वेताने टॉप २० फायनलिस्टमध्ये स्वत:ची वेगळी अशी जागा तयार केली होती. यावेळी पहिल्यांदाच पाकिस्तानमधील एका मॉडेलने मिस यूनिवर्स २०२३ या स्पर्धेत सहभाग घेतला होता.