Mirzapur 3 Twitter Review: 'मिर्झापूर' ही वेब सीरिज तिसऱ्या सीझनसह पुन्हा एकदा ओटीटी विश्वात धुमाकूळ घालत आहे. पंकज त्रिपाठी आणि अली फजल स्टारर 'मिर्झापूर ३' पुन्हा एकदा नव्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिर्झापूरची गादी काबीज करण्यावरून पुन्हा कालीन भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यात जोरदार टशन बघायला मिळणार आहे. मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, 'मिर्झापूर ३' ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सोशल मीडियावरही ‘मिर्झापूर ३’ची जोरदार चर्चा सुरू आहे. ट्विटरवर देखील 'मिर्झापूर ३'बद्दल प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे. चला तर, एक नजर टाकूया, ट्विटरवर 'मिर्झापूर ३'बद्दल नेटकरी काय म्हणतायत…
मिर्झापूरच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने एका दमदार कथानकाने प्रेक्षकांना प्रभावित केले होते. दोन्ही सीझनमध्ये ‘मिर्झापूर’चे सिंहासन काबीज करण्यावरून कालीन भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यात जोरदार भांडण बघायला मिळाले. अशातच आज 'मिर्झापूर'चा तिसरा सीझनही प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी मिर्झापूरचा तिसरा सीझन एका नवीन कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. अनेक युजर्सना तिसऱ्या सीझनची स्टोरी खूप दमदार वाटली, तर अनेकांना ‘मिर्झापूर ३’ पाहिल्यानंतर ‘मजा नही आया’ असं म्हणावं वाटलं आहे.
गुड्डू किंवा कालीन भैय्या यांच्या अभिनयाने लोकांचे मनोरंजन केले आहे. 'मिर्झापूर ३'बाबत एका युजरने लिहिले की, 'मिर्झापूर सीझन ३ म्हणजे एकदम भौकल, बवाल, पॉवर, इज्जत.' आणखी एक जण लिहितो की, ‘तिसऱ्या सीझनमध्येही बरंच काही शिल्लक राहिलंआहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागात आम्हाला जी मजा आली, ती यात नव्हती.’
एकाने लिहिले की, 'आम्हाला मुन्ना भैय्याची खूप आठवण आली, यात दमदार संवादही नाहीत.' आणखी एक जण लिहितो की, ‘मिर्झापूरचा पहिला आणि दुसरा सीझन खूप चांगला होता, पण तिसरा सीझन खूपच बोरिंग वाटत आहे. यात काही आशय नाही आणि कथाही नाही, हा खूप कंटाळवाणा सीझन आहे.’ एका युजरने लिहिले की, ‘यावेळी कालीन भैय्याची जादू फिकी पडली आहे. पण गुड्डू भैय्याचा भैय्याचा भौकाल दिसला आहे.’ अनेक नेटकऱ्यांनी गुड्डू भैय्याचं कौतुक केलं आहे.