Kolkata Case : देशात चाललंय काय? कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या-mimi chakraborty receives rape threats after joining protest over kolkata doctor s rape murder ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kolkata Case : देशात चाललंय काय? कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या

Kolkata Case : देशात चाललंय काय? कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या

Aug 21, 2024 02:17 PM IST

Mimi Chakraborty Kolkata Case: प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची माजी खासदार मिमी चक्रवर्ती हिने मंगळवारी कोलकाता बलात्कार प्रकरणासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती.

Mimi Chakraborty Kolkata Case: कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या
Mimi Chakraborty Kolkata Case: कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या

Mimi Chakraborty On Kolkata Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच न्यायाची मागणी करत आहेत आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची माजी खासदार मिमी चक्रवर्ती हिने मंगळवारी कोलकाता बलात्कार प्रकरणासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच, आता अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या. याशिवाय तिच्या फोनवर सतत अश्लील मेसेज येऊ लागले आहेत. मिमी चक्रवर्तीने यासंदर्भात कोलकाता पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांच्या सायबर सेल विभागालाही टॅग केले आहे.

अशाप्रकारे बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्यानंतर माजी खासदार मिमी चक्रवर्तीने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, 'आणि आम्ही महिलांना न्याय देण्याची मागणी करत आहोत? हे त्यापैकीच काही आहेत. या गर्दीत मुखवटा धारण करून फिरणारे हेच विषारी पुरुष बलात्काराच्या धमक्या देत असतात. आणि हेच लोक म्हणतात की, ते महिलांच्या पाठीशी आहेत. मला सांगा असे कोणते संस्कार आणि शिक्षण आहे, ज्यात हे शिकवलं जातं?' यासोबतच अभिनेत्रीने धमक्यांचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने घेतला न्यायाच्या लढाईत भाग

अभिनेत्री मिमी चक्रवर्ती हिने कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात भाग घेतला होता. त्यांच्याशिवाय मधुमिता सरकार, रिद्धी सेन आणि अरिंदम सिल हे देखील या या आंदोलनाचा भाग बनले होते. त्यांनी कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आपला विरोध व्यक्त केला. १४ ऑगस्ट रोजी आंदोलक आरजी कार मेडिकल कॉलेजच्या बाहेर जमले होते, जिथे त्यांनी निषेध केला.

अभिनेत्रीने केला निषेध

अभिनेत्री मिमी चक्रवर्ती २०१९ ते २०२४पर्यंत जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिली आहे. अलीकडे, तिने पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बाहेर इतर महिलांसोबत ३१ वर्षीय डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा निषेध व्यक्त केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगाल सरकारने आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि विभागीय चौकशी सुरू केली आहे.