'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला

'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 17, 2024 09:39 PM IST

या न्यूड फोटोशूट विरोधात अनेक खटले दाखल झाले होते. जवळपास १४ वर्षे खटला सुरु होता. आता हे फोटोशूट कोणते होते चला जाणून घेऊया…

controversial photo shoot
controversial photo shoot

९० च्या दशकात, २ मराठी पोरं पोरींनी न्यूड फोटोशूट केलं आणि संपूर्ण देशात खळबळ माजली. ९० चे दशक हे बदलाचं होत. चित्रपट टेलिव्हिजन, म्युजिक, जाहिराती, मीडिया अशा सर्व क्षेत्रामध्ये नवनवीन आणि बोल्ड असे प्रयोग अगदी बिनधास्त पणे केले जात होते. आजच्या सोशल मीडिया आणि OTT च्या काळात न्यूडीटी हाविषय जरी नॉर्मलाईज झाला असला तरी ९०च्या काळात बोल्ड कपडे घालणं हा देखील वादाचा विषय ठरायचा. मात्र या बोल्डनेस भारतात, बोल्ड मॉडेलिंगची संस्कृती रुजू केली होती. सर्वत्र मॉडलिंगचे वारे वाहू लागली होते. टीव्ही चॅनेल्स आणि प्रिंट मिडियामध्ये जाहिरातींचा वेग वाढला होता. त्यामुळे मॉडेल्सना जाहिरातींमध्ये जागा मिळत होती. यादरम्यान अशीच एक जाहिरात वादग्रस्त ठरली ती म्हणजे मराठमोळे मॉडेल मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांची एक प्रिंट जाहिरात.

काय होती जाहिरात?

मधू सप्रे हिने १९९२ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. तर मिलिंद सोमण तोपर्यंत भारतीय मॉडेलिंग क्षेत्रातला एक उगवता तारा होता. त्याने त्याच वर्षी अलिशा चिनाईच्या मेड इन इंडिया या लोकप्रिय म्युझिक अल्बमद्वारे लोकप्रियता मिळवली होती. १९९५ मध्ये टफ शूज हा इंटरनॅशनल ब्रँड भारतात पाय रोवू पाहत होता. मात्र इतर भारतीयांसाठी हा तुलनेने अज्ञात ब्रँड होता. त्यामुळे त्यांनी भारतीय मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्याच्या हेतून ही जाहिरात शूट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मिलिंद आणि मधू सप्रे यांची निवड करण्यात आली. या काळात मधु आणि मिलिंद एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या रंगल्या होत्या. त्यामुळे दोघांनी ही जाहिरात सहज केली असावी असेही लोकांचे मत होते.

छायाचित्रकार प्रबुद्ध दासगुप्ता यांनी काशीद येथील तिच्या घरी शूट केली होती. मात्र ज्यादिवशी ही जाहिरात काही मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाली संपूर्ण देशात खळबळ माजली. कारण या जाहिरातीत दोघेही ‘न्यूड’ होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. फक्त पायात शूज घातले होते आणि ते एकमेकांना चिकटून उभे होते. ही जाहिरात अधिक मसालेदार करण्यासाठी, त्यांच्या अंगावर गुंडाळलेला अजगरदेखील ठेवण्यात आला होता. ती जाहिरात अश्लील असल्याच्या आरोप अनेक संघटना आणि राजकीय पक्षांकडून झाले.

अनेक संस्थांनी घेतला आक्षेप

शिवसेनेकडून त्यावेळी निषेधाच्या घोषणा झाल्या. तर मुंबई ग्राहक पंचायत आणि स्वयंसेवी ग्राहक संघटना यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून, जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती. दोन्ही मॉडेल्सवर महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायदा, 1986 चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. शिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत, मोहिमेमागील एजन्सी ॲम्बियन्स ॲडव्हर्टायझिंग विरुद्ध प्राणी हक्क गटाने एक खटला दाखल केला. त्यांच्यावर अजगराचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आणि प्राण्यांवर क्रूर वर्तन केल्याचा आरोप होता. हे प्रकरण 14 वर्षे न्यायालयात खेचले गेले.

१४ वर्षे कोर्टात चालला खटला

१४ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर 2009 मध्ये खटला निकाली काढण्यात आला आणि सोमण व सप्रे यांच्यासह इतर सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पीठासीन न्यायाधीश एमजे मिर्झा यांनी आपल्या निकालात असे निरीक्षण नोंदवले की, “समाजाच्या एका गटासाठी जे अश्लील असू शकते ते दुसऱ्या गटासाठी अश्लील असू शकत नाही.”
वाचा: चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी करणे टाळले

तथापि, या वादाचा फायदा कंपनीला झाला. या वादामुळे अधिकाधिक ग्राहक या शूजकडे आकर्षित झाले. या जाहिरातीने अनेक पुरस्कार जिंकले आणि सुरुवातीला टफ्स शूजच्या विक्रीला चालना मिळाली, मात्र तरीही इतर ब्रॅण्ड्स भाऊगर्दीत टफ काही टॅग धरू शकला नाही. मात्र या जाहिरातीची गणती आजही सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये होते.

Whats_app_banner