मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आयुष्य आणि परंपरा यांच्यातील संघर्षाची गोष्ट! 'परंपरा' चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित

आयुष्य आणि परंपरा यांच्यातील संघर्षाची गोष्ट! 'परंपरा' चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 19, 2024 09:41 AM IST

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'परंपरा' या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आयुष्य आणि परंपरा यांच्यातील संघर्षाची गोष्ट! 'परंपरा' चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित
आयुष्य आणि परंपरा यांच्यातील संघर्षाची गोष्ट! 'परंपरा' चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित

व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अशा कितीतरी रूढी आणि परंपरा आहेत ज्या आपण अशाच डोळ्यांवरच्या पट्ट्या ठेवून पाळत असतो. कितीतरी परंपरा आज काळानुसार कालबाह्य ठरल्या असल्या तरी देखील आपण आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या, सांगितलेल्या आहेत म्हणून आपण त्या पाळत असतो. अशाच काहीश्या विषयावर आधारित मराठी चित्रपटसृ्ष्टीमध्ये एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव 'परंपरा' असे असून सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

ट्रेंडिंग न्यूज

समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला "परंपरा" हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वत्र चर्चा रंगली आहे. उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी ट्रेलर पाहून नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. एकंदरीत ‘परंपरा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही, तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचे जगणे, सामाजिक ताण याचे दर्शनही घडवते. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा ‘परंपरा’ चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही.
वाचा: मुक्ता हिला इंद्राने काढले घराबाहेर, कार्तिकचा डाव त्याच्यावरच उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार

कोणते कलाकार दिसणार?

अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत "परंपरा" या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे.
वाचा: 'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर

प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक

प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे. विशेषत: महाराष्ट्रातील, जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्र निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे."परंपरा" एक समृद्ध सिनेमॅटिक अनुभव देण्यास तयार आहे.
वाचा: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

IPL_Entry_Point

विभाग