मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'या' कारणामुळे मिलिंद गुणाजीने नाकारला DDLJ, आज होतोय पश्चाताप

'या' कारणामुळे मिलिंद गुणाजीने नाकारला DDLJ, आज होतोय पश्चाताप

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 21, 2024 01:05 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाची ऑफर आली होती.पण त्यांनी ती एका कारणामुळे नाकारली.

'या' कारणामुळे मिलिंद गुणाजीने नाकारला DDLJ, आज होतोय पश्चाताप
'या' कारणामुळे मिलिंद गुणाजीने नाकारला DDLJ, आज होतोय पश्चाताप

बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटाच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.' या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री काजोल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटासाठी मराठमोळे अभिनेते मिलिंद गुणाजी यांना ऑफर आली होती. पण काही कारणास्तव त्यांनी ती नाकारली.

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड केले. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर परदेशातही तुफान कमाई केली होती. या चित्रपटाच्या स्टार कास्टला तर तुफान लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात शाहरुख आणि काजोलसोबत अमरीश पुरी, अनुपम खेर, फरीदा जलाल आणि परमीत सेठी हे कलाकार दिसले होते. यापैकी एका कलाकाराची जगा मिलिंद गुणाजीला मिळणार होती. पण त्यांनी या भूमिकेला नकार दिला होता. ती भूमिका मिलिंद यांनी का नाकारली यामागचे कारण देखील सांगितले आहे.
वाचा: अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, फोटो पाहून चाहते झाले चकीत

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातील कुलजीत ही भूमिका परमीत सेठीने साकारली होती. सर्वात आधी या भूमिकेची ऑफर मिलिंद गुणाजी यांना देण्यात आली होती. पण या भूमिकेसाठी दाढी काढावी लागणार असल्यामुळे मिलिंद यांनी नकार दिला. पण हा चित्रपट हिट ठरल्यानंतर मिलिंद यांना पश्चाताप होत होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वत: याबाबत प्रतिक्रिया दिली.
वाचा: अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

मिलिंद गुणाजी या भूमिकेविषयी बोलताना म्हणाले, ''दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातील कुलजीत ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती. ती भूमिका परमीत सेठीने साकारली होती. पण दाढी काढावी लागणार असल्यामुळे मी नकार दिला होता. खरं तर ती त्या पात्राची गरज होती. पण या चित्रपटासोबतच मी आणखी एक-दोन चित्रपट करत असल्यामुळे मला दाढी काढणे शक्य नव्हते. एखा इतक्या मोठ्या दिग्दर्शकाला मी नाही म्हणाले. मला खूप वाईट वाटले होते. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो गाजला.'

मिलिंद गुणाजी यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाची ऑफर जरी नाकारली असली तरी ते नंतर 'देवदास' या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्यांनी विरासत, एलओसी कारगिल, फिर हेरा फेरी, सीआयडी आणि रुद्र या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट हिट होताना दिसत होते.

IPL_Entry_Point