मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपटांमधून खलनायक साकारणारा अभिनेता म्हणजे मिलिंद गुणाजी. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. गेल्या काही वर्षांपासून मिलिंद हा चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवून असल्याचे दिसत आहे. तो काही मोजक्याच भूमिका साकारत आहेत. आज १४ जुलै रोजी मिलिंदचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी...
बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटाच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.' या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री काजोल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटासाठी मराठमोळे अभिनेते मिलिंद गुणाजी यांना ऑफर आली होती. पण काही कारणास्तव त्यांनी ती नाकारली.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड केले. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर परदेशातही तुफान कमाई केली होती. या चित्रपटाच्या स्टार कास्टला तर तुफान लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात शाहरुख आणि काजोलसोबत अमरीश पुरी, अनुपम खेर, फरीदा जलाल आणि परमीत सेठी हे कलाकार दिसले होते. यापैकी एका कलाकाराची जगा मिलिंद गुणाजीला मिळणार होती. पण त्यांनी या भूमिकेला नकार दिला होता. ती भूमिका मिलिंद यांनी का नाकारली यामागचे कारण देखील सांगितले आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातील कुलजीत ही भूमिका परमीत सेठीने साकारली होती. सर्वात आधी या भूमिकेची ऑफर मिलिंद गुणाजी यांना देण्यात आली होती. पण या भूमिकेसाठी दाढी काढावी लागणार असल्यामुळे मिलिंद यांनी नकार दिला. पण हा चित्रपट हिट ठरल्यानंतर मिलिंद यांना पश्चाताप होत होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वत: याबाबत प्रतिक्रिया दिली.
वाचा: अनंत-राधिकाच्या लग्नात दीपिका पादूकोणने घातला अनारकली ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का
मिलिंद गुणाजी यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाची ऑफर जरी नाकारली असली तरी ते नंतर 'देवदास' या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्यांनी विरासत, एलओसी कारगिल, फिर हेरा फेरी, सीआयडी आणि रुद्र या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट हिट होताना दिसत होते.
संबंधित बातम्या