Anant Ambani-Radhika Merchant Engagement : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. राजस्थानमधील एका प्राचीन मंदिरात दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर ते नुकतेच मुंबईत परतले आहेत. या निमित्ताने अंबानींच्या अँटीलिया या आलिशान घरामध्ये जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी गायक मिका सिंह याने स्वतः गाणं गात अंबानींच्या लेकाचं आणि होणाऱ्या सुनेचं स्वागत केलं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे मुंबईत भव्य स्वागत करण्यात आले. या पार्टीसाठी दोघेही अँटीलियाला पोहोचले होते, तेव्हा या खास प्रसंगी मिका सिंह देखील उपस्थित होता. मिका सिंहने आपल्या दमदार या जोडप्याचे स्वागत केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिका सिंहने या खास प्रसंगी १० मिनिटांचा परफॉर्मन्स दिला आणि त्यासाठी त्याला तब्बल १.५ कोटी रुपये मानधन म्हणून मिळाले होते. मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिका सिंहसोबतच बॉलिवूडची अनेक कलाकार मंडळी या पार्टीत सहभागी झाली होती. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, आयन मुखर्जी आणि जान्हवी कपूर यांचा समावेश होता. बॉलिवूड कलाकारांनी या पार्टीला उपस्थित राहून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा साखरपुडा सोहळा राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. अनंत आणि राधिका एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तर, अनंत सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जिओ आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये बोर्डाचा सदस्य म्हणून विविध पदांवर काम करत आहे. तर, अंबानी यांची होणारी सुनबाई राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअरच्या संचालक बोर्डवर आहे.
संबंधित बातम्या